राज्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. आज रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाडा व विदर्भातील काही ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुजरात आणि राजस्थानच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशातील काही भागात ढगाळ हवामान आहे.
राज्यात उद्यापासून कोकणात मध्यम स्वरुपाच तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागात हलका पाऊस पडेल. अनेक भागात ढगाळ हवामानासह कडाक्याचे ऊन पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. सध्या मध्यप्रदेश, पश्चिम राजस्थान आणि नैऋत्य उत्तर प्रदेशच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तसेच अरबी समुद्राच्या आग्रनेय भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे काही भागात हलक्या सरी पडत आहे.
शनिवारी सकाळी पर्यंत खानदेशातील पारोळा येथे ८३.० मीलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊश झाला. कोकणात ठाणे, पालघर, रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस झाला.
Share your comments