1. बातम्या

कोकण अन् मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता

आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हलक्या स्वरुपाचा पाऊस होणआर असल्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, या जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडतील.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हलक्या स्वरुपाचा पाऊस होणआर असल्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, या जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडतील. तर मराठावाड्यात आणि विदर्भात उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील वातावरणात बदल होत आहे.

सध्या अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग व दक्षिण महाराष्ट्राची किनारपट्टी परिसरात चक्रवाताची स्थिती आहे. तर बंगालच्या उपसागर व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता असून परतीच्या पावसाला परतण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे राज्यातील वातावरणात बदल होत आहेत. तर उत्तर भागात पावसाची उघडीप दिल्याने कमाल तापमानात वाढ होत असल्याचे हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान काल रविवारी कोकणात ढगाळ वातावरण होते, पण दुपारनंतर हे वातावरण निवळले. सकाळी आठवाजेपर्यंत पेण येथे सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात लवकर लागवड झाल्याने पीक काढणीला आली आहेत. मात्र, अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे भात काढणी लांबणीवर पडत आहे.
दरम्यान परतीच्या मॉन्सूनने आपली वाट पकडली असून उत्तर भारतातून मॉन्सून परतू लागला आहे. उद्या राजस्थान, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश व गुजरातच्या काही भागातून मॉन्सून परतणार आहे.

English Summary: Chance of light rain in Konkan and Central Maharashtra Published on: 05 October 2020, 08:50 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters