बंगाल उपसागरच्या ईशान्य परिसरात उद्या पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात कमी झालेला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा साधरण सरी कोसळतील. सध्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठावाड्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान आहे. अधून मधून ऊन पडत असले तरी सायंकाळी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
विदर्भात काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. रविवारी आणि सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. दरम्यान मंगळवारी राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान देशातील इतर राज्यातही पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील २४ तासात अंदमान व निकोबार, कर्नाटकातील किनारपट्टी, बिहारच्या काही भागात, उत्तर प्रदेशातील पुर्वेकडील भाग, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि ओडिशामधील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. यासह पुर्वेकडील भारतात, मध्य प्रदेशातील दक्षिण भाग, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि केरळमध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Share your comments