राज्यात आज मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. कालपासून मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून हलका पाऊस सुरू झालेला आहे. आता पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची गैरहजरी आहे. पण आता श्रावण सुरु झाल्यापासून राज्यात पावसाचा पुन्हा पाऊसाचा जोर वाढणार आहे. रविवार आणि सोमवारी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.
हिमालयाच्या पायथ्याकडे गेलेला मॉन्सूनचा आस पाकिस्तान आणि परिसरावर असलेली पश्चिमी चक्रावाताची स्थिती त्यापासून कोकणापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पावसाने उघडीप दिली होती. मॉन्सूनचा आस दोन दिवसांत दक्षिणेकडे आला असल्याने राज्यात पाऊस पुन्हा सुरू झाला आहे.
दरम्यान बुधवारी दुपारीनंतर येवल्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. पावसामुळे काही शेतकऱ्यांचा कांदा भिजला. यासह देशाची राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी पाऊस झाल्याने नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाली.
दरम्यान अजून पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. गुरुवारी मुसळधार पाऊस होऊ शक्यतो असा अंदाज वर्तवण्यात आला असून सतर्क राहण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दिल्लीसह हरियाणा, पंजाब, आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
Share your comments