weather
सध्या राज्याच्या काही भागात पावसाला सुरवात झाली आहे.काही ठिकाणी तुरळक पावसाला सुरवात झाली आहे. या तुरळक पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण जून महिन्यात सुरवातीला पाऊस झाला परंतु काही दिवस पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळं शेतकरी चिंतेत होता आणि त्यात दुबार पेरणीचे संकट याची काळजी होती.
काही भागात वातावरणात बदल:
सध्या राज्यातील अनेक ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांची दुबार पेरणी ची काळजी मिटलेली आहे.कोकणाबरोबरच राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पाऊस अजिबात पडला नाही परंतु हवामान खात्याने पुढील 4 दिवसात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.त्यामुळं काही भागात वातावरणात बदल आढळून आले आहेत बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
परंतु पुढच्या आठवड्यात पावसाचा जोर हा खूप वाढेल असा सुद्धा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे.मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागात ऊन पाहायला मिळत आहे. तर बरोबर 7 दिवस कोकणात जोराचा पाऊस पडत आहे. तसेच कालपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र मध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. पण येथील पाऊस हा मध्यम स्वरूपाचा किंवा तुरळक स्वरूपाचा आहे त्यामुळे येथील पाणी पातळीत मोठया प्रमाणात घट झालेली आढळून आली आहे.
त्यामुळं येथील शेतकरी वर्गावर दुबार पेरणीचे संकट ओढवेल या मुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. येत्या 2 दिवसात म्हणजेच 48 तासात महाराष्ट्र राज्यातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या भागात 2 दिवस जोरदार पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे.
Share your comments