1. बातम्या

राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या मतानुसार महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ हवामान राहणार आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


भारतीय हवामान विभागाच्या मतानुसार महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ हवामान राहणार आहे.   राज्याच्या किनारपट्टीलगतच्या भागात आज दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील नाशिकपासून ते पुणेपर्यंताच्या अनेक भागात जोराचा पाऊस होण्याची शक्यता आहे.  गेल्या दोन - तीन दिवसांपासून राज्याच्या काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. आज ३ ऑगस्ट ते ५ ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे , कोल्हापूर, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस होणार आहे. तर नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, सांगली, आणि औरंगाबादेत ५ ऑगस्टपर्यंत हलक्या स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

दरम्यान २४ तासात मुसळधार ते अतिवृष्टी म्हणजे ६४.५ मीमी ते २०४.४ मीमी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  अरबी समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात मॉन्सून सक्रिय आहे. पावसाला पोषक हवामानामुळे राज्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मॉन्सून आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून आसामपर्यंत सक्रिय आहे. याशिवाय उत्तर भारतात मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगर, पिलानी ते मेघालपर्यंत कायम आहे.

यामुळे राज्यात ढगाळ वातावरणाची स्थिती असून राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडला. रविवारी सकाळपर्यंतच्या आठवाजेपर्यंतच्या चोवीस तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे ५४.४ मीलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रातही घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला.

English Summary: Chance of heavy rains in most parts of the state 3 august Published on: 03 August 2020, 06:49 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters