1. बातम्या

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता

KJ Staff
KJ Staff


राज्यातील तापमान वाढले आहे. उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक हैरान झाले आहेत. गुरुवारी सकाळपर्यतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे देशातील उच्चांकी ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यासह पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामन विभागाने वर्तवली आहे. दरम्यान अजून दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहणार असून त्यानंतर तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान हवामान विभागाच्या मते १० मेपासून पुढील चार दिवसापर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. १० ते १३ मे च्या दरम्यान राजधानी दिल्ली आणि आजुबाजूच्या परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. आज दिल्लीतील तापमान ३९ अंश सेल्सिअस किमान तापमान २१ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. चक्रीय हवा सक्रिय असल्याने देशातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी बिहार राज्यातील काही भागात वादळासह पाऊस पडला. तर काही ठिकाणी गारपिट झाली आहे. दक्षिण-पश्चिमी राजस्थान आणि आसपासच्या परिसरात चक्रिय हवेचे क्षेत्र बनले आहे. दक्षिण-पूर्वी मध्य प्रदेश आणि त्याच्या लगतच्या छत्तीसगडवरही चक्रीय हवेचे क्षेत्र आहे.  मागील २४ तास - पुर्वेकडील भारतात पावसाची स्थिती होती. तर काही ठिकाणी पाऊस पडल्याची माहिती हाती आली आहे. बिहारमधील काही भागात गारपिटीसह दमदार पाऊस झाला आहे. झारखंड, पुर्व आणि मध्य उत्तरप्रदेशातील काही भागात तसेच केरळमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters