राज्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस पडल्यानंतर पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. येत्या दोन दिवसानंतर पावसाचा जोर आणखी कमी होणार होणार आहे. पण काही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात पावसाची काहीशी उघडीप राहणार आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मंगळवारी मुंबईसह पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढत असून या पावासामुळे काढणी केलेली भात भिजला आहे. खरिपातील पिके मातीमोल झाली आहेत. त्यात पुन्हा भर पडत असल्याने शेतकरी अडचणी आला आहे. दरम्यान बंगालचा उपसागराच्या परिसरात चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती उत्तरेकडे पश्चिम भागाकडे सरकरण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची तीव्रता अधिक नसल्याने दोन दिवसात ते विरुन जाण्यायी शक्यता आहे. तसेच अरबी समुद्राच्या पश्चिममध्य भागात व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र अजूनही काही प्रमाणात सक्रिय आहे. त्यामुळे राज्यातील कोकण व मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
येत्या दोन दिवसात राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होऊन कडाक्याचे ऊन पडेल. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा काहीसा वाढणार असून उन्हाचा चटका वाढेल. राज्यात कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तर खानदेशातील धुळे, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. इतर भागात काही अंशी ढगाळ हवामान राहिल. पंधरा दिवसांपुर्वी गुजरात, मध्य प्रदेश, व अरबी समुद्रा या भागातून परतीच्या मॉन्सूनने माघार घेतल्यानंतर काही दिवस रेंगाळला होता. मात्र, बुधवारी उत्तर प्रदेशातील बहुतांशी भाग, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्किम, झारखंड, उत्तर छत्तीसगड, मध्य प्रदेशातील काही भागातून माघार घेतली आहे. दरम्यान येत्या तीन ते चार दिवसात आणखी माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
Share your comments