राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान तयार झाले असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी कोकणातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्र , मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. आज परत कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात, मराठवाड्यातही मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यात मुसळधार पावसाच आरेंज अर्लट देण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, पुणे जिल्ह्यासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भातही वादळी वाऱ्यासह जोरजार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
इतर राज्यातही दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बिहार आणि उप हिमालयीन प्रदेश पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये पुढील ३ दिवसात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुढील १२ तासात पुर्वी उत्तर प्रदेश, दक्षिण बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर मध्य प्रदेशात आणि राजस्थानच्या पुर्व भागात विजांच्या मेघगर्जनेसह दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान , दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. अनेक ठिकाणी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. मॉन्सूनचा आस दक्षिणेक़े सरकला असून पंजाबच्या अमृतसरपासून उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. हा कमी दाबाचा पट्टा आणखी दक्षिणेकडे सरकणार आहे. अरबी समुद्रावरुन बाष्प पुरवठा होणार असल्याने गुरुवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, कोकणता मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Share your comments