1. बातम्या

मध्य महाराष्ट्र, कोकणात जोरदार पावसाची शक्यता

मॉन्सून सक्रिय झाला असून राज्याच्या विविध भागात पावसाने जोर धरला आहे. गेल्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


मॉन्सून सक्रिय झाला असून राज्याच्या विविध भागात पावसाने जोर धरला आहे. गेल्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे.

दरम्यान देशातील इतर राज्यातही मुसळधार पाऊस होत आहे.  हवामान विभागाच्या मते १२ ते १८ तासांमध्ये देशातील बहुतेक राज्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आसाम आणि बिहारसह २० राज्यांचे बचाव पथक एनडीआरएफच्या १२२ पथक पाठवण्यात आले आहेत. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील अनेक शहरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या २४ तासांमध्ये पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँडच्या काही भागात पाऊस होणार आहे. पश्चिम बंगाल, ओडिसा, उत्तर प्रदेश, उत्तर- पुर्वी भागातील केरळ, कर्नाटकातील किनारपट्टीचा भाग, महाराष्ट्रातील कोकण, गोवा, गुजरात या राज्यांमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

दरम्यान ,मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याची स्थिती सातत्याने बदलत आहे. शुक्रवारी हा पट्टा सर्वसाधरण स्थितीवर आल्याने राजस्थानच्या बिकानेरपासून बंगालच्या उपसागरापर्यत विस्तारला होता. केरळ व कर्नाटक किनारपट्टीलगत समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची  स्थिती सक्रीय आहे. यातच अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे.  दरम्यान आज ठाणे, रायगड, सिंधुदुर्गात पाऊस होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

दरम्यान काही दिवसांपासून दडी मारणाऱ्या पावसाने गुरुवारी उत्तर महाराष्ट्राच्या विविध भागात दमदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यात सातत्याने जोरदार पाऊस सुरुच आहे.  शुक्रवार सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धुळ्यातील शिंदखेडा येथे सर्वाधिक १६४ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

English Summary: Chance of heavy rains in Central Maharashtra, Konkan Published on: 25 July 2020, 11:43 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters