गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे सर्वांची तारांबळ उडाली आहे. या पावसामध्ये मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. आता बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. येणारं वादळ हे 'सीतरंग' या नावानं (Sitrang Cyclone) ओळखलं जाणार आहे.
यामुळे आता सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 23 आणि 24 ऑक्टोबरच्या सुमाराला पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यामुळे आता हे वादळ काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या महाराष्ट्रात परतीचा पाऊस कोसळत आहे. दिवाळीत देखील पावसाचा जोर असण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे.
सध्या एकीकडं राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच शेती पिकांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. 20 ते 21 ऑक्टोबरच्या दरम्यान हे चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांकडे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपनीकडून पैशाची मागणी
त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, सध्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अनेक शेतकऱ्यांची हातातोंडाला आलेली पिके वाहून जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे आता शेतकरी आर्थिक मदतीची मागणी करत आहेत.
दिवाळीनंतर कांदा ५० रुपयांवर जाणार, व्यापाऱ्यांनी व्यक्त केला अंदाज..
राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहेत. यामुळे आता सरकार काय मदत करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
सेंद्रिय शेतीसाठी रासायनिक कीटकनाशकांची चिंता सोडा, कडुलिंबाचा हा पर्याय घरीच बनवा
नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
50 हजार प्रोत्साहनपर लाभ योजनेचा 20 ऑक्टोबरपासून शुभारंभ, सहकारमंत्र्यांची माहिती..
Share your comments