1. बातम्या

Chana Crop Management : हरभऱ्यातील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

या अळीचे शास्त्रीय नाव (Helicoverpa armigera) आहे. ही एक बहुभक्षीय कीड असून, ती सुमारे १८१ पेक्षा अधिक पिकांवर तिचा जीवनक्रम पूर्ण करते. या घाटे अळीच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Chana Crop Management

Chana Crop Management

डॉ. उल्हास सुर्वे, आकाश मोरे आणि डॉ. श्रद्धा दिलपाक 
हरभरा हे रब्बी हंगामातील मुख्य डाळवर्गीय पीक म्हणून हरभरा पिकाची लागवड केली जाते. बहुउपयोगीतेमुळे व दाळ वर्गीय पिकामध्ये सर्वात जास्त उत्पादकता असल्या कारणाने हरभरा हे महाराष्ट्रातील महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. इतर कडधान्याच्या तुलनेत हरभऱ्यावर फार कमी कीड आढळतात परंतु मुख्यत्वे करून सध्याच्या काळात ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आढळत आहे. 
या अळीचे शास्त्रीय नाव (Helicoverpa armigera) आहे. ही एक बहुभक्षीय कीड असून, ती सुमारे १८१  पेक्षा अधिक पिकांवर तिचा जीवनक्रम पूर्ण करते. या घाटे अळीच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. 

जीवनक्रम :
१.या अळीच्या अंडी, अळी, कोष आणि पतंग या चार अवस्था असतात. त्यातील अळी अवस्था अधिक नुकसानकारक असते.
२.मादी पतंग गोलाकार हिरवट पिवळसर रंगाची सुमारे साधारणपणे २५० ते ५०० अंडी पाने, कळी व फुलांवर घालते. अंडयातून ५ ते ६ दिवसात अळी बाहेर पडते.
३.अळीचा रंग हिरवट असतो. साधारण १४ ते २० दिवसांत अळीची वाढ पूर्ण होते. त्यानंतर पिकाजवळील जमिनीत ती कोषावस्थेत जाते.
४.कोष अवस्था साधारण एक आठवडा ते एक महिन्यापर्यंत असतो.

नुकसानीचा प्रकार :
१.साधारण नोव्हेंबर ते मार्च या काळात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
२.हवेतील आद्रता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त, कमी सूर्यप्रकाश या बाबी किडीच्या प्रादुर्भावास पोषक ठरतात.
३.लहान अळी पानातील हरित द्रव्ये खाते. त्यामुळे पानांवर पांढरे पट्टे दिसतात. मोठी अळी कळी, फुले आणि घाटयावर उपजीविका करते.
४.एक अळी साधारणपणे ३० ते ४० घाटे खाते. त्यामुळे पिकात सुमारे ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.
५.अळीचे अर्धे शरीर घाटयामध्ये तर अर्धे शरीर बाहेर असे तिचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.

एकात्मिक कीड व्यवस्थापन :
१.उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरट करावी. त्यामुळे अळीची कोष अवस्था जमिनीवर उघडी पडून सूर्यप्रकाशामुळे किंवा पक्षामुळे नष्ट होते.
२.योग्य वेळी आणि योग्य अंतरावर हरभरा पिकाची पेरणी करावी.
३.मका किंवा ज्वारीची हरभरा पिकामध्ये पक्षीथांबे म्हणून लागवड करावी.
४.पीक ३० ते ४० दिवसांचे झाल्यानंतर आंतरमशागत व कोळपणीची कामे करावी.
५.आंतरमशागत करून तनवर्गीय वनस्पती जसे कोळशी, रामभेंडी, पेटारी इत्यादी काढून टाकावे.
६.शेतामध्ये एकरी २० ते २५ पक्षीथांबे उभारावेत.
७.शेतामध्ये एकरी ५ ते ६ कामगंध सापळे लावावेत.
८.मुख्य पिकाभोवती एक ओळ झेंडूची लावावी. जेणेकरून कीड झेंडूकडे आकर्षित होईल.
९.पिकाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. मोठया अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
१०.पीक अळी अवस्थेत असताना सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करावा.
११.किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास रासायनिक पद्धतीचा अवलंब करावा.
आर्थिक नुकसान पातळी: १ ते २ अळ्या प्रति एक मीटर ओळ किंवा ८ ते १० पतंग प्रति कामगंध सापळा.

सेंद्रिय नियंत्रण :
१.आझाडिरेक्टीनची (३०० पीपीएम) २ ते ३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे पहिली फवारणी करावी.
२.पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवासांनी प्रभावी नियंत्रणासाठी एच. ए. एन. पी. व्ही. ५०० एल. ई (हेलिओकिल) १ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

रासायनिक नियंत्रण : (आवश्यकता भासल्यास वापरावे)
१.इमामेक्टीन बेन्झोएट (०.५ % एस.जी) ०.४४ ग्रॅम किंवा
२.क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (१८.५ % एस.सी) ०.३ मिलि किंवा
३.इन्डोक्साकार्ब (१५.८० ई.सी) ०.६६६ मिलि किंवा
४.क्विनॅालफॉस (२५ % ई.सी) २ मिलि किंवा
५.लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (०५ % ई.सी) 0.८ मिलि

लेखक - डॉ. उल्हास सुर्वे ,प्राध्यापक, कृषिविद्या विभाग, म. फु. कृ .वि., राहुरी.
आकाश मोरे, वरिष्ठ संशोधन सहयोगी (कृषी कीटकशास्त्र) सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, म.फु.कृ.वि. राहुरी. मो. ७३५०७८०४५८
डॉ.श्रद्धा दिलपाक वरिष्ठ संशोधन सहयोगी (कृषी अनुजीवशास्त्र ) सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, म.फु.कृ.वि. राहुरी.

English Summary: Chana Crop Management Integrated Management of Chana Cutworm in Chana Published on: 11 January 2024, 05:32 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters