आज नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी हा दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. या बैठकीची माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी 22,303 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, रब्बी हंगामासाठी अनुदान 1 ऑक्टोबर 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत चालु असेल. नायट्रोजनसाठी अनुदान 47.2 रुपये प्रति किलो, फॉस्फरस 20.82 रुपये प्रति किलो, पोटॅश अनुदान 2.38 रुपये प्रति किलो असेल. सल्फर अनुदान प्रति किलो 1.89 रुपये असेल. खतांच्या किमतींवरील अनुदान कायम राहणार आहे. तसेच एनबीएस अंतर्गत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत खते मिळतील आणि युरियाच्या दरातही वाढ केली जाणार नाही असे काही महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत.
रब्बी हंगामासाठी पोषक तत्वावर आधारित अनुदान दिले जाणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या वाढत्या किमतींचा भारतातील शेतकऱ्यांवर परिणाम होऊ देणार नाही, असा निर्धार सरकारने केला आहे. सन 2021 पासूनच, शेतकऱ्यांवर अतिरिक्त बोजा पडू नये अशा पद्धतीने अनुदान दराचे व्यवस्थापन केले जात आहे.डीएपीवरील अनुदान 4500 रुपये प्रति किलो या दराने सुरू राहील. टनाबद्दल बोलायचे झाले तर जुन्या दरानुसार डीएपी 1350 रुपये प्रति बॅग या दराने मिळेल. NPK 1470 रुपये प्रति बॅग या दराने उपलब्ध होईल.
Share your comments