G 20 Update
दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबर रोजी जी-२० परिषद पार पडत आहे. यानिमित्ताने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसह अनेक देशाचे प्रमुख नेते दिल्लीला भेट देणार आहेत. त्यामुळे आलेल्या उपस्थित मान्यवरांची योग्य सोय व्हावी, यासाठी संपूर्ण तयारी केली जात आहे. मात्र यादरम्यान परदेशी पाहुण्यांना पाडवण्यात आलेल्या जेवणाच्या आमंत्रण पत्रिकेवर 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख केला आहे. याबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत संताप देखील व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रपतींनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रावर 'President Of India' ऐवजी 'President Of Bharat'असा उल्लेख केल्याचा दावा जयराम रमेश यांनी केला आहे. "संविधानाच्या आर्टिकल एक नुसार, भारत जो इंडिया आहे, जो अनेक राज्यांचा समूह म्हणून ओळखला जातो. परंतु आता या राज्यांच्या समुहावर हल्ला होत आहे." असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
"भारताच्या संविधानामधील पहिल्या कलमामध्ये 'भारत जो पूर्वी इंडिया म्हणून ओळखला जायचा हा संघराज्य आहे. मात्र आता या 'संघराज्या'वरही अत्याचार होत आहेत,"अशी टीकाही काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे.
दरम्यान, आगामी काळात संसदेचं १० दिवसांचं अधिवेशन होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात देशाचं नाव बदले जाण्याबाबत चर्चा होण्याची शक्यताही काँग्रेसकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे अधिवेशनात नेमकं काय होणार याच्याबद्दल तर्कवितर्क सुरू असताना त्यातली एक शक्यता या नामबदलाची पण आहे का याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आह.
Share your comments