1. बातम्या

शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा खतपुरवठा करणार

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
आगामी खरीप हंगामासाठी देशात पुरेसा खतांचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी रसायने आणि खत मंत्रालयाचा खत विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असा माहिती केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी दिली आहे. आत्तापर्यंतची उपलब्धतेची स्थिती समाधानकारक असल्याचे त्यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.

शेतकऱ्यांना वेळेवर पुरेशा प्रमाणात खतांची मात्रा पुरविण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. खतांची निर्मितीवाहतूक आणि उपलब्धतेवर खत विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि त्या अनुषंगाने विविध राज्य सरकार तसेच रेल्वे मंत्रालयाच्या सतत संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कर्नाटकविषयी स्वतंत्र ट्विट करताना गौडा म्हणाले, "कर्नाटक राज्याचा विचार केला तर राज्यात बियाणेखते आणि कीटकनाशकांची कमतरता नाही. यासंदर्भात आम्ही कर्नाटक सरकारशी सतत संवाद साधत आहोत. आजमितीस कर्नाटक सरकारकडे 7.3 लाख टन साठा आहे आणि त्यांची मासिक गरज ही 2.57 लाख टन आहे."

खत विभागाअंतर्गत सार्वजनिक क्षेत्र उपक्रम नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) ने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की नांगलभटिंडापानिपत बीट आणि विजापूर हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी युरिया बाजारपेठेत नियमितपणे पाठविण्यात येत आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters