गेल्या बऱ्याच महिन्यापासून खाद्य तेलाचे दर गगनाला पोचले असून सर्वसामान्यांना न परवडणारे झाले आहे.या दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते.
परंतु हे दर नियंत्रणात आणण्यासाठी आता केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता केंद्र सरकारने खाद्यतेल आणि तेलबियांची साठवणुक करण्याचा आदेश राज्यांना दिला आहे. पुरवठासाखळी आणि व्यापारी यांना कुठल्याही प्रकारचा बाधा न आणता या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सरकारने काढला आहे. याबाबतीत खाद्यतेल व तेलबिया यांच्या साठवणुकीचे मर्यादाही तीन महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे.
या आदेशांमध्ये साठवणुकीची मर्यादेचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. याबाबतीत केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची यासंदर्भात बैठक घेऊन योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात चर्चा केली आणि परिस्थितीचा देखील आढावा घेतला राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी या मर्यादेचा आदेश लागू करावा. आदेश लागू करताना पुरवठासाखळी आणि व्यापार यात कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करून घ्यावी यावर या बैठकीत भर देण्यात आला अशी माहिती मंत्रालय यांनी दिली.
यामुळे साठेबाजी आणि काळाबाजार यावर देखील नियंत्रण राहील अशी आशा मंत्रालयाने व्यक्त केली आहे. या बैठकीत खाद्यतेल यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती आणि तिथली स्थिती यासंबंधीची माहिती देखील राज्यांना केंद्रीय मंत्रालयाकडून देण्यात आली.
Share your comments