कायमच दुष्काळग्रस्त पट्टा म्हणून ओळखला जाणाऱ्या मराठवाड्यात मागील काही वर्षांपासून अतिवृष्टीने थैमान घातलेले दिसते. याहीवर्षी मराठवाड्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सगळ्यात जास्त नुकसान हे मराठवाड्यात झाले. त्या अनुषंगाने मराठवाडा विभागात अचूक हवामानाचा अंदाज कळू शकेल अशा यंत्रणा ची गरज भासत आहे. त्या अनुषंगाने मराठवाड्यातील हवामानाची अचूक माहिती देण्यासाठी औरंगाबाद मध्ये 15 कोटी रुपये खर्च करून कायमस्वरूपी डॉप्लर रडार बसवण्यात येणार आहे.याद्वारे हवामानाचा अचूक अंदाज कळण्यास मदत होईल.
डॉप्लर रडार च्या साह्याने पावसाचा अचूक अंदाज,हवामानात झालेला बदल,वादळ किंवा गारपिटीचा अंदाज शेतकऱ्यांना लवकर कळू शकेल. सध्या हवामान बदलाच्या परिस्थितीमुळे पाऊस, वारा इत्यादी बद्दल अचूक अंदाज लावता येणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा फटका सहन करावा लागतो. त्यामुळे अचूक अंदाज देणाऱ्या डॉप्लर रडार च्या शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे.
हे डॉप्लर रडार औरंगाबाद शहरात बसवण्यात येणार-
हवामानाचा अचूक अंदाज घेणारी यंत्रणा मराठवाड्यात असावी, अशा प्रकारची मागणी मराठवाड्यातून सातत्याने होत होती. अखेर केंद्र सरकारकडून त्या मागणीचा विचार करण्यात आला आहे. लवकरच औरंगाबाद शहरात डॉप्लर रडार बसवण्यात येणार असल्याचे पत्र केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना मिळाले आहे. शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संदर्भात अचूक माहिती या रडारच्या माध्यमातून मिळणार असल्याचे सांगितले आहे.
नेमके काय आहे डॉप्लर रडार?
डॉप्लर रडार हे एक विशेष रडार आहे जे अंतरावरील वस्तू बद्दल वेग डेटा तयार करण्यासाठी डॉप्लर प्रभाव वापरते. हे इच्छित लक्षा वरून मायक्रोवेव सिग्नल बाउन्स करून आणि ऑब्जेक्टच्या गतीने परत आलेल्या सिग्नलची वारंवारता कशी बदलली याचे विश्लेषण करून हे करते.ही भिन्नता रडारच्या तुलनेत लक्ष्याच्या वेगाच्या रेडियल घटकाचे थेट आणि अत्यंत अचूक मापन देते.(स्त्रोत-मी E शेतकरी)
Share your comments