केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना आणि योजनांवर अनुदान देऊन शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करणे सुलभ होईल अशा पद्धतीचे निर्णय घेत आहे आता नवीन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे त्यासाठी केंद्र सरकारने डिजिटल प्लॅटफॉर्म किसान सारथी सुरू केले आहे.
या किसान सारथी प्लॅटफॉर्मच्या च्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांच्या पीक व इतर पिकासंबंधीची महत्वाची माहिती दिली जाईल.
किसन सारथी प्लॅटफॉर्म च्या सहाय्याने शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत वेळेत पिकास संबंधीची माहिती उपलब्ध केली जाईल तसेच तसेच या प्लॅटफॉर्म द्वारे शेतकरी आपले पीक व भाजीपाला योग्यरीत्या व योग्य वेळी बाजारात विकू शकतील.
किसान सारथी या डिजिटल प्लॅटफॉर्म चे लॉन्चिंग हे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किसान सारथी या डिजिटल प्लॅटफॉर्म चे लॉंचिंग केले.
यावेळी बोलताना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकरी वैज्ञानिकाकडून शेती व त्या संबंधित क्षेत्रातील वैयक्तिक सल्ला घेऊ शकतील. तसेच बोलताना ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांचे धान्य त्यांच्या शेतात, गोदामे, बाजारपेठेत आणि इतर ठिकाणी पोहोचविण्याच्या क्षेत्रात नवीन तांत्रिक हस्तक्षेपांवर संशोधन केले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना आपला माल कमी खर्चात विकू शकतील.
किसान सारथी चा उपयोग शेतकऱ्यांना कसा होईल?
या डिजिटल प्लॅटफॉर्म च्या साह्याने शेतकऱ्यांना चांगले पीक तसेच योग्य प्रमाणात उत्पादन कसे घ्यावे या व अनेक मूलभूत गोष्टींची माहिती यावर मिळू शकेल. पिकाविषयी ची कोणतीही माहिती शेतकरी थेट वैज्ञानिककडून घेऊ शकतात. तसेच शेतकरी शेतीतील विविध पद्धती शिकू शकतात. या डिजिटल प्लॅटफॉर्मचा शेतकऱ्यांना नक्कीच मदत होईल यात शंका नाही.
Share your comments