भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर आधारित असून भारतीय अर्थव्यवस्था देखील कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राला विविध योजनांच्या माध्यमातून बळ देण्याचे सातत्याचे प्रयत्न केंद्र सरकार व राज्य सरकार मार्फत होत आहेत.
शेतीचे नाहीतर शेतीपूरक जोडधंदे जसे की, मत्स्यव्यवसाय, पशूपालन या व्यवसायाकडे देखील विशेष लक्ष दिले जात आहे.कारण या क्षेत्रांमध्ये भरपूर अशी क्षमता असल्याने त्याचा फायदा हा शेतकरी सक्षम होणे मध्ये होऊ शकतो.याशेती जोड धंद्यांना पाठबळ मिळाले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढेल तसेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती देखील होईल. याच अनुषंगाने मत्स्य व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय यामध्ये प्रगती व्हावी यासाठी अतिरिक्त निधीही उपलब्ध करून दिला जात आहे. या वर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पाचा विचार केला तर यामध्ये दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदी मध्ये तब्बल 44 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
देशातील 80 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न
भारतामध्ये बरेच शेतकरी हे शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. अशा शेतकऱ्यांना पशुपालन क्षेत्राशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी व या तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पादनात नक्कीच वाढ होणार आहे. पशुपालना मध्ये दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन आणि राष्ट्रीय दुग्ध विकास कार्यक्रमांतर्गत असलेल्या अर्थसंकल्पामध्ये 20 टक्केनिधी मध्ये वाढ करण्यात आली असून देशी गाईंची संख्या, उत्पादकता आणि दूध उत्पादन वाढवण्याची देखील सरकारचे उद्दिष्ट आहे. इतकेच नाहीतर पशुपालना मध्ये जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील यंत्रणा उभारण्यात आली आहे. यामुळे पशुधन आरोग्य आणि रोगाच्या बजेटमध्ये 60 टक्के वाढ करण्यात आली आहे.
या माध्यमातून मोफत लसीकरणाची व्यवस्था करणे तसेच पशुधन वाचवणे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनावरांमधील आजाराची ओळख करून देण्याची क्षमता विकसित करणे यासारखे प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. भारतातील लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रात गुंतलेली असून या क्षेत्राशी संबंधित असलेल्या मत्स्यपालन आणि पशुपालना मध्ये विकासाची गंगा आली तर ग्रामीण अर्थव्यवस्था देखील बळकट होऊन रोजगाराच्या बऱ्याच संधी उपलब्ध होतील व बेरोजगारांच्या हाताला देखील काम मिळेल.
Share your comments