केंद्र सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे योजले आहे व त्या अनुषंगाने शासन शेतकऱ्यांना मदत म्हणून विविध प्रकारच्या योजना आणि पॅकेज देत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी नरेंद्र मोदी यांनी शेती क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी एक लाख कोटी ची विशेष निधीची घोषणा केली. या निधीच्या माध्यमातून कृषि पायाभूत सुविधांचे सशक्तीकरण केले जाणार आहे.
वाराणसी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ करत असताना मोदी बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की केंद्र सरकारने नुकतेच कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे सशक्तिकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पायाभूत सुविधांचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी एक लाख कोटी रुपयांच्या विशेष निधीची उभारणी करण्यात आली आहे यातून बाजार समित्यांचे विकास करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या कामाचे कौतुक केले व म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश आला आधुनिक करण्यासाठी झपाट्याने कामे सुरू केली आहेत.
त्यांच्यामुळे सध्या उत्तर प्रदेशात कायदा आहे. उत्तर प्रदेश मधील माफियाराज आणि आतंकवाद आटोक्यात आला आहे. कायदा पासून आपण वाचू शकत नाही हे गुन्हेगारांना उमगले आहे. मुख्यमंत्री स्वतः कष्ट घेत आहेत. ते विकास कामाचे स्वतः पाहणी करत असतात असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारने शेती क्षेत्रातील पायाभूत सुविधा आधुनिक करण्यासाठी 1 लाख कोटींचा निधी उभारला आहे. या योजनेत बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील मंडी, बाजार समित्या बळकट करण्यासाठी सरकारने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. यातून शेतकऱ्यांना बाजाराच्या संधी उपलब्ध होतील असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Share your comments