बाळापुर तालुक्यामधील स्वरूपखेड या गावी उत्तम कापूस निर्मिती प्रकल्प ,कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर, तसेच कॉटन कनेक्ट यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला, त्या मध्ये सर्वात प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मध्ये क्षेत्र प्रवर्तक गौतम तायडे यांनी जागतिक महिला दिवस साजरा का करतात याची पार्श्वभूमी सांगितली, तसेच प्रकल्प गावामध्ये कशाप्रकारे राबवल्या जाते, तसेच महिला शेतकऱ्यांनी प्रकल्पामध्ये का सहभाग वाढवावा त्याचे फायदे काय होतील, महिला सक्षमीकरण याविषयी संपूर्ण माहिती क्षेत्र प्रवर्तक सतीश गायकवाड यांनी सांगितले.
शिंदे सरकारची मोठी घोषणा! नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षेत्र प्रवर्तक अमोल लाखे यांनी केले, आभार प्रदर्शन क्षेत्र प्रवर्तक आशिष सोळे यांनी केले व कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल ठोंबरे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमासाठी मंचकावर-गावच्या सरपंच विजयाताई परघरमोर, प्रमुख पाहुणे म्हणून वर्षाताई परघरमोर (कोविड योद्धा) पुरस्कार पुरस्कृत, गौतमा ताई गावंडे अंगणवाडी सेविका, संगीता ताई परघरमोर (बीसीआय शेतकरी), बहुसंख्या महिला शेतकरी हजर होत्या.
महत्वाच्या बातम्या;
शेततळे योजनेचा विस्तार, जलयुक्त शिवारला संजीवनी, अर्थसंकल्प जाणून घ्या
'अर्थसंकल्प म्हणजे 'बड्या-बड्या बाता अन् शेतकऱ्यांना लाथा'
शेतकऱ्यांनो गहू, हरभरा, द्राक्ष आणि इतर पिक काढणीला आली असतील तर घाई करा, पुन्हा पावसाची शक्यता
Share your comments