माणसे आणि प्राणी यांचे एकमेकांशी स्नेहपूर्ण आणि अगदी सहृदय संबंध असतात. याचे प्रत्यंतर आपल्याला प्रत्येक वेळी येत असते.
. त्यातच शेतकरी कुटुंब म्हटले म्हणजे गाय, बैल, म्हशी तसेच अगदीशेळ्या जरी असल्या तरी खूपच मानसिक तार जोडलेले असतात. त्यातच बैल म्हटले म्हणजे शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र असतो. अशाच या जिवाभावाच्या मित्राचा वाढदिवस साजरी करणे ही कल्पनाच किती मनाला आल्हाददायक व सुखदायक वाटते. असेच आपल्या कुटुंबातील सदस्य सारखा असणारा लाडक्या बैलाचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करणारे पाखरे कुटुंबीय आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
नक्की वाचा:तापमानवाढीमुळे जीव गुदमरतोय; घरात लावा 'ही' झाडे आणि मिळवा थंड हवा
लाडक्या बैलाचा वाढदिवस आणि 700 जणांना जेवणाची पंगत
कारभार गल्ली वडगाव येथील मारुती परशुराम पाखरे व संजीव पाखरे हे शेतकरी कुटुंब असून या कुटुंबाला अगदी सुरुवातीपासूनच शेती करण्याची आवड असून त्या माध्यमातून जनावरांचे देखील खूप आवड आहे
या कुटुंबाकडे असलेली बैल जोडी गेल्या अनेक वर्षापासून शर्यतीमध्ये भाग घेत असून पारितोषिक देखील पटकावतात. या कुटुंबाचे वैशिष्ट्य म्हणजे या कुटुंबाने बैल खरेदी केल्यानंतर त्याची ते चांगल्या प्रकारे जोपासना करतात व त्यासोबत बैलांवर जीवापाड कुटुंबाप्रमाणे प्रेम करतात. त्यांच्या या बैलाच्या वाढदिवसानिमित्त ते जेवणाची पंगत देतात सोया वाढदिवसात कमीत कमी सातशे हुन अधिक लोक जेवणाचा आनंद लुटतात. तसेच अनेक शेतकरी या बैलांच्या वाढदिवसात सहभागी होऊन आनंद द्विगुणित करतात.
नक्की वाचा:मोफत रेशन! 6 महिन्यांसाठी मोफत रेशनची घोषणा, मोबाईल OTP वरून मिळवा रेशन..
आतापर्यंत पाखरे यांच्या या बैलजोडीने कर्नाटक आणि महाराष्ट्र मधील अनेक बैलगाडा शर्यत मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कुटुंबाकडे नाग्या नावाचा एक बैल असून त्याने अनेक बैलगाडा शर्यती मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
म्हणून या बैलाला हिंदकेसरी नाग्या म्हणून देखील ओळखले जाते. याचा वाढदिवस दोन एप्रिलला असतो त्यामुळे या दिवशी या बैलाला खूप चांगल्या प्रकारे सजवले जाते व घरातील व गल्लीतील महिला बैलाचे पूजन करून आरती करतात. त्यानंतर त्याला वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा देत केक सुद्धा कापला जातो. या बैलाचा वाढदिवस हे कुटुंब अनेक वर्षापासून करत असून या परिसरातील अनेक शेतकरी कुटुंबे या बैलाच्या वाढदिवसात उपस्थित राहतात.
Share your comments