2019-20 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीला सीसीईएची मंजुरी

24 October 2019 08:05 AM


नवी दिल्ली:
2019-20 साठी सर्व रब्बी पिकांसाठीच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 2020-21 या रब्बी विपणन हंगामात ही पिकं बाजारात येणार आहेत.

2020-21 या रब्बी विपणन हंगामासाठीच्या रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत केलेली वाढ ही देशपातळीवर सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट किमान आधारभूत किंमत ठेवावी या 2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या तत्वाला अनुसरून आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे.

2020-21 या रब्बी विपणन हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपीत मसुरासाठी सर्वात जास्त वाढ म्हणजे 325 रुपये प्रती क्विंटल, करडई 270 रुपये प्रति क्विंटल, चणा 255 रुपये प्रति क्विंटलची शिफारस करण्यात आली आहे. मोहरीच्या एमएसपीत 225 रुपये प्रति क्विंटल वाढ तर गहू आणि जवाच्या एमएसपीत 85 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे.

MSP minimum support price narendra modi एमएसपी किमान आधारभूत किंमत नरेंद्र मोदी CCEA Cabinet Committee on Economic Affairs
English Summary: CCEA approves msp for rabi crops of 2019-20

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.