सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर हे गाव तसे द्राक्ष पिकासाठी प्रसिद्ध आहे परंतु काही दिवसांपासून या गावच्या शेतशिवारात गाजराचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. त्याला निमित्त सांगितले जात आहे ते या गावचे पाणी.
पाण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे येथील गाजराला वेगळीच सवय असून सध्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने राज्यभर त्याचे मागणी तर राहतेस परंतु कर्नाटक राज्यात देखील येथून गाजराचीनिर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते.
नेमके काय आहे कवलापूरच्या गाजराचे वेगळेपण?
कोल्हापूरची ओळख आता गाजरांचा गाव म्हणून होत आहे. या गावच्या पाण्यातच वेगळेपण असल्याने गाजराची चव वेगळी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मकर संक्रांतीच्या कालावधीत तर या गावच्या गाजर आला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
मकर संक्रांतीला गाजर विक्रीसाठी उपलब्ध व्हावे याचे नियोजन करूनच गाजराची लागवड करण्यात येते. कमी कालावधीमध्ये जास्तीचे उत्पन्न म्हणून गाजर लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा तर होत आहे परंतु येथील गाजरांची निर्यात कर्नाटक राज्यात देखील होत आहे.
कवलापूरच्या गाजरांची वैशिष्ट्ये
कोल्हापूरचे शेतकरी कुठल्याही प्रकारचे रासायनिक खतांचा उपयोग किंवा प्रक्रिया न करता निव्वळ शेणखत आणि सव्वा पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करून केवळ तीन महिन्यात गाजराचे उत्पादन घेतात. शेतकरी गाजराची उत्पादने सेंद्रिय पद्धतीने घेतात त्यामुळे त्याला वेगळेपणआहे.येथील शेतकरी स्वतः गाजराची विक्री करतात.
गाजरांची काढणी झाल्यानंतर त्यांची स्वच्छता करण्यासाठी म्हणजेच धुण्यासाठी गावात पाण्याचे मोठे टॅंक बनवण्यात आले आहेत. रोलर मध्ये गाजर टाकून ती स्वच्छ पाण्याने घेतली जातात व यावर्षी गाजराचा भाव हा एका किलोमागे 22 ते 23 पर्यंत असून पुढच्या दोन दिवसात हा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कवलापूर हे गाव गाजर शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले आहे. (स्त्रोत-होय आम्ही शेतकरी)
Share your comments