आज पर्यंत ऊसात, मोकळ्या माळरानावर किंवा इतर पिकात गांच्या (Cannabis) लावलेला आपण ऐकला असेल. पण आता तर चक्क अंगणातच गांज्या लावला आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील चांडोळा येथे एकाने चक्क घराच्या अंगणातच गांजाचे झाड लावले होते.
पोलिसांनी (Police) या ठिकाणी धाड टाकून ७ किलो ६९० ग्रॅम वजनाचे हे झाड जप्त केले आहे. ही कारवाई २७ मार्च रोजी करण्यात आली. या प्रकरणात मुखेड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. कपिल गंगाराम गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. त्याने घराच्या मोकळ्या जागेत गांजाचे झाड लावले होते. गांजाची विक्री करण्यासाठी हे झाड त्याने लावले होते.
महत्त्वाच्या बातम्या :
खरीप हंगामातील खतांच्या संकटावर मात करण्यासाठी कृषी विभाग उतारले मैदानात
जिल्हा बॅंकेने कर्जमर्यादा वाढवली; आता शेतकऱ्यांना एकरी मिळणार 'इतके' वाढीव कर्ज
पोलिसांनी या ठिकाणाहून ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात पोउपनि गजानन काळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला झाला आहे. दरम्यान आरोपीने घराच्या अंगणात लावलेल्या गांजाचे झाड चांगलेच मोठे झाले होते. परंतू पोलिसांना मात्र तो पर्यंत पत्ताच लागला नव्हता. पुढील तपास पोलीस करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
ऊसाचा राडा काय संपेना; हंगामाच्या अंतिम टप्प्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न पेटणार
Share your comments