गांजाची शेती करणे तसा कायद्याने गुन्हा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून गांज्या शेतीची अनेक प्रकरणे सामोर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील गांजा लागवड केल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील शेतकऱ्यांने ऊसाच्या पिकामध्ये आंतरपिक म्हणून थेट गांजाचीच लागवड केली आहे. त्यांच्या शेतामध्ये गांजाची 490 रोपे आढळून आली आहेत.
ऊसाच्या फडात केली गांज्याची शेती
शेतकरी वेगवेगळ्या माध्यमातून गांजाची लागवड करत आहे. ऊसाच्या फडात गांजाची लागवड केली आहे. सैनिक टाकळी येथे सदाशिव कोळी यांनी जवळपास 500 रोपांची लागवड केली होती. दरम्यान, त्यांच्या घरावर छापा टाकून 490 रोपे आणि लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शिवाय संशयित आरोपी सदाशिव कोळी याला ताब्यात घेतले असून कुरंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंतरपिक म्हणून ऊसाच्या फडात गांजाची लागवड केल्याचे उघड झाले होते. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, शिवाजी पोलीस ठाण्याचे पो.नि. महादेव वाघमोडे यांच्यासह पथकाने गांजा लागवड केली जात असलेल्या शेतावरच छापा टाकला आहे. सदाशिव कोळी यांनी ऊसाच्या फडात लागवड तर केली होती पण त्याची साठवणूक ही घरात करीत होते. तालुक्यात सध्या फडात गांजा लागवड हा विषय चर्चेचा बनला आहे.
Share your comments