सध्या बऱ्याच दिवसापासून शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये नेमकी चूक कोणाची? हा सुध्दा एक मोठा प्रश्न आहे. अशाच पार्श्वभूमीची एक बातमी सध्या समोर आली आहे.
परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात शॉर्टसर्किट होऊन तब्बल शंभर एकर उसाला आग लागून ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की,पालम तालुक्यातील सोमेश्वर व फळा या शिवारामध्ये सहा मार्चला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही आगीची घटना घडली. शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा सध्या प्राथमिक अंदाज आहे.जर या पालम तालुक्याचा विचार केला तर या परिसरात उसाचे क्षेत्र जास्त आहे. अक्षरशा कारखान्याच्या गाळप क्षमते पेक्षा जास्त उसाची लागवड या परिसरात आहे.
हा ऊस तोडणी अभावी शेतात असताना या शिवारातीलशिवरस्त्यालगत शॉर्टसर्किट मुळे ऊसाला आग लागली. शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु आगीचे रौद्ररूपापुढे कुणाचे काहीच चालले नाही शेवटी शेतकऱ्यांना गंगाखेड येथून अग्निशमन दलास पाचारण करावे लागले. अग्निशमन पथक पोहोचेपर्यंत आगीने वाऱ्यासारखे पसरून एका शेतातून दुसऱ्या शेतात जात व उसाची पाचट वाळल्यामुळे आग विझवता येणे सुद्धा शक्य झाले नाही व
आगीचे मोठे मोठे लोड निर्माण होऊन आगीच्या भक्ष्यस्थानी जवळपास शंभर एकरावरीलऊस सापडला व सोमेश्वर व फळा शिवारातील जवळपास पन्नास हून अधिक शेतकऱ्यांच्या ऊस जळून खाक झाला. यामध्ये अंदाजे सर्व शेतकरी मिळून एक कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Share your comments