1. बातम्या

मास कम्युनिकेशन झालेल्यां उमेदवारांना महावितरणमध्ये नोकरीची संधी; मिळेल एक लाख रुपयांचा पगार

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये (The Maharashtra State Electricity Board Holding Co. Ltd) रिक्त जागा भरल्या जाणार आहे. यासाठी कंपनीतर्फे जनरल मॅनेजर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी देण्यात येणार वेतन ऐकून तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. दरमहा एक लाख रुपयांचा पगार या पोस्टसाठी मिळणार आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
महावितरणमध्ये नोकरीची संधी

महावितरणमध्ये नोकरीची संधी

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये (The Maharashtra State Electricity Board Holding Co. Ltd) रिक्त जागा भरल्या जाणार आहे. यासाठी कंपनीतर्फे जनरल मॅनेजर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी देण्यात येणार वेतन ऐकून तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. दरमहा एक लाख रुपयांचा पगार या पोस्टसाठी मिळणार आहे.

दरम्यान नोकरीची माहिती अधिकृत वेबसाइट www.msebindia.com वर या नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. MSEB होल्डिंग कंपनी मुंबई (The Maharashtra State Electricity Board Holding Co. Ltd) Recruitment Board, Mumbai तर्फे ही घोषणा करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना २६ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

काय आहे शैक्षणिक पात्रता

जनरल मॅनेजर (कॉर्पोरेट कम्युनिकेशन अॅण्ड मीडिया मॅनेजमेंट) या पदासाठी अनुभवी, हुशार उमेदवाराची गरज आहे. यासाठी उमेदवाराकडे कम्युनिकेशन, अॅडवर्टाइसमेंट अॅण्ड कम्युनिकेशन मॅनेजमेंट, पब्लिक रिलेशन, मास कम्युनिकेशन, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण असणे गरजेचे आहे.

अनुभव

उमेदवाराकडे खासगी क्षेत्रातील कामाचा किमान १५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. १ हजारहून नोकरदार वर्ग असलेल्या कॉर्पोरेट कंपनीचे पीआर संभाळण्याची क्षमचा उमेदवाराकडे असावी. जाहीरात क्षेत्र, टीव्ही क्षेत्रासोबतच रेडीओ, इंटरनेट मीडिया अशा क्षेत्रात काम केल्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. मीडिया प्लानिंग, प्रेस रिलेशन, आर्टिकल लिखाण, रेडीओ, टेलिव्हिजन, सोशल मीडियासाठी लिहिण्याचा अनुभव असावा. उमेदवाराकडे संवाद क्षमता, प्रश्न सोडविण्याची क्षमता, मॅनेजमेंट स्किल आणि लीडरशीप क्वालिटी असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्य विद्युत विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वय २९ जुलै २०२१ पर्यंत ४८ वर्षांच्या आत असावे.

 

कालावधी आणि पगार

ही भरती दोन वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे. या भरतीतून निवड झालेल्या उमेदवाराला १ लाखापर्यंत पगार मिळू शकणार आहे.
नोटिफिकेशनसोबत अर्ज नमुना देण्यात आला आहे. उमेदवारांनी या नमुन्यानुसार दिलेल्या मुदतीपर्यंत अर्ज पाठवायचा आहे. अर्जावर Aplication for the post of general Manager (Corporate Communication And Midia Managment MSEBHCl असा स्पष्ट उल्लेख असणे गरजेचे आहे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचा आहे. द चीफ जनरल मॅनेजर (एचआर). एमएसईबी होल्डींग कंपनी लिमिटेड. चौथा माळा,एचएसबीसी बिल्डींग, एम.जी.रोड. फोर्ट. मुंबई-४०० ००१

अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा
MSEB वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा

English Summary: Candidates who have done Mass Communication will get a job opportunity in MSEDCL, a salary of one lakh rupees Published on: 17 September 2021, 04:37 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters