जिल्हा बँक या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असतात असे म्हटले जाते. परंतु आता जिल्हा बँकांच्या संबंधित एक महत्त्वाची बातमी आली असून त्यानुसार, राज्यातील जिल्हा बँका या लवकरच राज्य बँकेत विलीन होण्याची शक्यता असून केंद्र सरकारच्या सहकार खात्याने त्याबाबत अहवाल तयार करण्याचे देखील काम सुरू केले आहे. येणाऱ्या काही दिवसात अहवाल तयार होऊन यावर जिल्हा बँकांचे पुढील भवितव्य ठरणार आहे.
नक्की वाचा:ब्रेकिंग: मोदी सरकारला कृषी कायदे मागे घ्यायला लावणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अटक
येणाऱ्या तीन महिन्यात त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात येऊन यानंतर जिल्हा बँका या राज्य बँकांमध्ये विलीन होण्याची दाट शक्यता आहे. कारण जर आपण राज्यातील जिल्हा बँकांचा विचार केला तर बहुतांशी जिल्हा बँका या आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर या बँका राज्य बँकेत विलीन करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी दाट शक्यता आहे.
नक्की वाचा:जगाला भारत देशाकडून मोठी भेट, मोदी सरकार घेत आहे हा मोठा निर्णय
सध्या राज्यातील जिल्हा बँकांची स्थिती
राज्यातील जिल्हा बँकांचा विचार केला तर या बँकांच्या कारभाराकडे राज्य सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसत असून बहुतेक बँका या आर्थिक तोट्यात आहेत. तसे पाहायला गेले तर या बँकांना आरबीआयच्या निर्देशांचे मुळे अतिरिक्त अधिकार प्राप्त झाले आहेत. जिल्हा बँकांच्या बाबतीत आरबीआयकडून देखील
राज्य बँकेत विलीन करण्यासंबंधीचे नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. जिल्हा बँकेची त्रिस्तरीय रचना न ठेवता ती द्विस्तरीय असावी, या एका विचारातून आता जिल्हा सहकारी बँका या राज्य बँकेत विलीन करण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा:Gujarat Election: गुजरातमध्ये होणार महामुकाबला! केजरीवाल ठोकणार गुजरातमध्ये तळ..
Share your comments