निम्न पैनगंगा प्रकल्प हा यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील ताडसावली येथे असून महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना एक वरदान ठरणार असा प्रकल्प आहे.
परंतु गेल्या अनेक वर्षापासून हा प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पाचा फेररचनेचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला आहे. माग च्या आठवड्याभरापूर्वी विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाच्या कालावधीत येणाऱ्या दोन महिन्यात याबाबतचा निर्णय घेऊन या कामाची लवकरच निविदा काढण्यात येईल असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले होते. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल अशी शक्यता आहे.
नक्की वाचा:अशी हि जिगर! एमबीएचे शिक्षण घेऊन मारली शेतीत उडी आणि फुलवली अश्वगंधा ची शेती
निम्न पैनगंगा प्रकल्पाचे महत्त्व आणि माहिती
हा विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा प्रस्तावित सिंचन प्रकल्प आहे.माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सातत्याने पाठपुरावा करून या प्रकल्पाला मान्यता मिळवली होती. परंतु कालांतरानेनिम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचा या प्रकल्पाला प्रखर विरोध होता.
. या प्रकल्पाला विरोध म्हणून नागपूर व औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या अनेक प्रलंबित होत्या. तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक अशा परवानग्या न मिळू शकल्या ने या प्रकल्पाचे काम बंद असून तो रखडला आहे. 2012 मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते, परंतु आवश्यक परवानग्या नसल्याचा आरोप धरणविरोधी संघर्ष समितीने केला व ऑक्टोबर 2014 मध्ये केंद्र शासनाने आवश्यक असलेल्या परवानग्या दिल्या. मात्र रखडलेले काम पुन्हा सुरू होऊ शकले नाही. परंतु तेलंगणा सरकारने महाराष्ट्र सरकारची परवानगी घेतली व धरणाच्या खालच्या बाजूच्या सीमेवर चना खा कोर्टा येथे 360 कोटी रुपये खर्चून बंधारा बांधला.
या प्रकल्पाची किंमत देखील वाढली
या प्रकल्पाला1997 ला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत 1402 कोटी 43 लाख रुपये होती. परंतु आजमीतिला या प्रकल्पाची अंदाजे किंमत 22 हजार कोटींच्या घरात आहे. हा प्रकल्प विदर्भासाठी बऱ्याच अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. या प्रकल्पाची सिंचनक्षमता 22000 हेक्टर पेक्षा जास्त असून यवतमाळ जिल्ह्याचे एक लाख 41 हजार 607 हेक्टर, चंद्रपूर जिल्ह्याच्या 58 हजार 355 हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येईल.
Share your comments