मागे एक दीड वर्षापूर्वी निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे शेतकऱ्यांनी पेरलेली सोयाबीन उगवलेच नव्हते. याबाबतच्या असंख्य तक्रारी दाखल झाल्या होत्या.
त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी घरगुती बियाणेच वापरण्यावर भर दिलेला आहे. दुसरे म्हणजे राज्यातील सोयाबीन लागवड क्षेत्राचा विचार केला तर ते 39 लाख हेक्टरपर्यंत आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन चे मागील खरिपात भरपूर नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात झाल्यामुळे पुरवठा कमी राहिला व भाव चांगले राहिले. याचाच परिणाम येणाऱ्या हंगामात लागवड क्षेत्र वाढण्यावर दिसून येण्याची शक्यता आहे. जर आपण मागील खरिपाचा विचार केला तर 46 लाख हेक्टर क्षेत्रा पेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली होती व यावर्षीही तेवढीच राहिली असा एक अंदाज आहे. मग या क्षेत्राचा जर विचार केला तर यासाठी पेरणीला किमान बारा लाख क्विंटल बियाण्याची गरज आहे.
सोयाबीन बियाणे पुरवठ्याची स्थिती
महाबीज हे प्रमुख बियाणे पुरवठा करणारे महामंडळ असून साडेचार लाख क्विंटल बियाण्याचे नियोजन महाबीज करीत असते. आणि उरलेली गरज ही खाजगी कंपन्या व काही शेतकरी घरगुती पद्धतीची बियाणे वापरून पूर्ण करतात अशा पद्धतीने भागवली जाते. परंतु जर या वर्षीच्या बियाण्याचा विचार केला तर या वर्षी खरीप हंगामात परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका बसलेला आहे. महाबीजला सुद्धा खरीपातून जेमतेम सव्वा लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकेल. यामध्येच अडीच ते पावणेतीन लाख क्विंटल बियाण्याची तुट आहे. यावर्षी उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनच्या माध्यमातून अजून 40 ते 50 हजार क्विंटल सोयाबीन बियाणे मिळेल अशी अपेक्षा महाबिजला आहे.
या सगळ्या आकडेवारीवरून खरीप व उन्हाळी अशा दोघांना मिळून महाबीज फक्त दीड ते पावणे दोन लाख क्विंटल बियाणे देऊ शकेल अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे राज्याने बियाणे क्षेत्रात स्वयंपूर्ण बनण्याची घोषणा केल्यामुळे दुसर्या राज्यातून बियाणे खरेदी करायचे असेल तर त्याला शासनाकडून परवानगी मिळेल काय हाही एक मोठा प्रश्न आहे.
नक्की वाचा:गव्हाला कधी इतका भाव ऐकला आहे का! गव्हाच्या या वाणाला मिळाला अविश्वसनीय भाव
जर यावर्षी चे सोयाबीनचे बाजार भाव पाहिले तर ते साडेसहा हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. यातच बियाणे साठीच्या सोयाबीनला यापेक्षा दीडपट भाव जास्त मिळत आहे.
त्यामुळे खाजगी कंपन्या सोयाबीन बियाण्याचे दर मागच्या हंगामात पेक्षा जास्त ठेवतील अशी चिन्हे आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात सोयाबीन बियाण्यांची टंचाई निर्माण होऊ शकते, म्हणून शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरावे अशा प्रचारावर कृषी खात्याचा जोर राहू शकतो.
Share your comments