महाविकास आघाडी सरकारने जी काही दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली होती त्यामध्ये जे नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून 50 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मध्यंतरी कोरोना कालावधीमुळे ही योजना लांबणीवर पडली होती.
नक्की वाचा:साखर आयुक्त ठराविक मंत्र्यांच्या सांगण्यावरून काम करतात; आयुक्तांवर गंभीर आरोप
परंतु आता राज्यातील 28 लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार असून यासंबंधीची बँकांनी दिलेल्या याद्याची छाननी पूर्ण झाली असून आता आधार प्रमाणीकरण यानंतर अंतिम याद्या प्रसिद्ध होऊन
त्यांचे चावडी वाचन देखील केले जाणार आहे व त्यानंतर पंधरा दिवसात अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली जाणार आहे. आपल्याला माहित आहेच की 2017-18 ते 2019-20 या तीन वर्षात दोन वर्ष नियमित कर्जाची परतफेड केली असल्यास अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. यासंबंधीची कृषी विभाग व बँकांकडून प्राप्त याद्याची छाननी पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम यादी जाहीर करण्याची तयारी सहकार विभागाने केली आहे.
याद्यांचे होणार चावडी वाचन
या मधून आयकर भरणारे,शासकीय नोकरदार तसेच आमदार व खासदार,माजी मंत्री व 25 हजारांपेक्षा जास्त मासिक निवृत्ती वेतन असलेली व्यक्ती यांना वगळण्यात आलेले आहे.
संपूर्ण छाननी पूर्ण झाल्यानंतर आठ दिवसाचा अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून या याद्यांचे वाचन गावोगावी ग्रामपंचायत कार्यालय बाहेर चावडी वाचन होणार आहे.
त्यानंतर शेवटी बँक खात्याशी आधार प्रमाणीकरण करून संबंधित मात्र शेतकऱ्यांच्या बचत खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार असून 20 ऑक्टोबर पूर्वी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Share your comments