यंदाचा गाळप हंगाम (Threshing season) हा खूप चर्चेचा विषय राहिला आहे. एफआरपी तुकडे, (FRP) एफआरपी वेळेवर न मिळणे अशा अनेक गोष्टी गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत.
अनेक प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न मंत्रालयाने ऊसाची FRP (ऊस दर) वाढविण्याबाबत कॅबिनेट नोट जारी केली आहे. झी बिजनेस ने दिलेल्या वृत्तानुसार FRP 15 रुपये प्रती क्विंटल वाढविण्याबाबत कॅबिनेट नोट जारी केली आहे. २०२१-२२ या हंगामासाठी ऊसाची एफआरपी २९० रुपये प्रती क्विंटल होती.
केंद्र सरकारने २५ ऑगस्ट रोजी गळीत हंगामासाठी एफआरपी ५ रुपयांनी वाढवून २९० रुपये प्रती क्विंटल करण्याचा निर्णय घेतला होता. जर सरकारने ऊस दरात वाढ केली तर साखर कारखान्यांवर याचा आर्थिक परिणाम निश्चितच दिसू शकेल.
भारतीय शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि फायदे
सध्याही 290 रुपये एफआरपी आहे. या उसाच्या एफआरपी वाढविण्याच्या मुद्द्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिल्यावर देशभरात उसाची एफआरपी 305 रुपये प्रति क्विंटल होईल. उसाची एफआरपी ही उसाच्या किमान आधारभूत किमती प्रमाणे असते. तसे पाहायला गेले तर एफआरपी केंद्र सरकार ठरवते.
शेतकरी पुत्राचा नादच खुळा..! संकटावर मात करत शेतकरी पुत्र झाला 'आयएएस'
Share your comments