Mumbai News : राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार नवरात्रीमध्ये होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ५०:२५:२५ असा असण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला ५० टक्के वाटा आणि शिंदे गट आणि अजित पवार गट यांना २५ टक्के वाटा असण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला भाजप आणि शिंदे गट यांचे सरकार होते. त्यामुळे ५०-५० टक्के वाटा होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट बाहेर पडून तो देखील सरकारमध्ये सामील झाला. यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात देखील त्यांना वाटा द्यावा लागला. त्यामुळे खाते वाटप आता विभागून होत आहे.
आमदारांच्या संख्येनुसार महामंडळाचं वाटप होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या महायुतीच्या सरकारमध्ये ५०:२५:२५ नुसार वाटप करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे अनेक महत्त्वाची खाती दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात सोपावण्यात आली आहेत.
विधानसभा आणि विधानपरिषदेच्या एकूण २८ समित्यांवर आमदारांची नेमणूक होणार आहे. समित्यांच्या अध्यक्ष आणि सदस्य पदांची यादी समन्वय समिती विधीमंडळात देणार आहे.
दरम्यान, नवरात्रीच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तसंच मागील काही दिवसांपासून भाजप-शिंदे गटातील काही मंत्र्यांना मंत्रिमंडळात बाहेर केले जाणार आहे अशी चर्चा रंगली आहे. यामुळे नेमके कोणत्या आमदारांचे मंत्रिपद काढून घेतले जाते. हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे.
Share your comments