2020 हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान हमीभावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Sunday, 15 March 2020 03:14 PM


नवी दिल्ली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वित्तीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत 2020 या वर्षाच्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान हमीभावाला मंजुरी देण्यात आली. सर्वसाधारण दर्जाच्या वाटी खोबऱ्याची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल 9,521 वरून 9,960 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर संपूर्ण खोबरे डोलची किंमत प्रति क्विंटल 9,920 वरुन 10,300 रुपये एवढी केली आहे. यामुळे खोबरे उत्पादकांना वाटी खोबऱ्यावर क्विंटलमागे 439 रुपये तर खोबरे डोलावर क्विंटलमागे 380 रुपयांचा लाभ होणार आहे.

देशभरात तयार होणाऱ्या खोबऱ्याचा सरासरी उत्पादन खर्च लक्षात घेऊन वाटी खोबऱ्याच्या उत्पादनातील 50 टक्के खर्च आणि खोबरे डोल उत्पादनातील 55 टक्के खर्च भरून निघावा, या उद्देशाने हा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. कृषी उत्पादने खर्च आणि किंमत आयोगाच्या (CACP) शिफारशींवर आधारित हा हमीभाव देण्यात आला आहे.

देशातील कृषी उत्पादनांच्या खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या तत्वावर हा हमीभाव वाढवण्यात आला आहे. खोबरे उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

narendra modi नरेंद्र मोदी खोबरे coconut नारळ Copra MSP minimum support price हमीभाव CACP कृषी उत्पादने खर्च आणि किंमत आयोग Commission for Agricultural Costs and Prices
English Summary: cabinet approves minimum support price for copra for 2020 season

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.