सुक्या खोबऱ्याच्या किमान पाठिंबामूल्यात वाढ

02 January 2019 08:30 AM


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीने आज सुक्या खोबऱ्याच्या किमान पाठिंबा मूल्यात वाजवी सरासरी दर्जा निरंतर रहावा यासाठी मंजुरी दिली. ही मंजुरी 2019 च्या हंगामासाठी असून प्रति क्विंटल 9,521 रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. वर्ष 2018 ला हे मूल्य 7,511 प्रति क्विंटल होते तसेच सुक्या खोबऱ्याचे किमान पाठिंबा मूल्य 2018 च्या 7750 रुपये प्रति क्विंटलवरुन वर्ष 2019 च्या हंगामासाठी 9,920 प्रति क्विंटलपर्यंत वाढले.

सूक्या खोबऱ्यासाठी ठरवलेल्या किमान पाठिंबा मूल्यामुळे शेतकऱ्यांना रास्त किमान मूल्य मिळण्याचे आश्वासन तसेच देशातील नारळ उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी गुंतवणूक निश्चित करणे अपेक्षित आहे.

कृषी मूल्‍य आणि किंमत आयोगाच्या (सीएसीपी) शिफारशींच्या आधारे ही मंजूरी देण्यात आली असून सीपीएसपीचे विशेषज्ञ यांनी उत्पादन मूल्य, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खाद्य तेलांच्या किंमतींचा कल आणि एकंदरीत मागणी आणि पुरवठा तसेच खोबऱ्याचे तेल बनविण्याच्या प्रक्रियेवरील मूल्य आणि शिफारस केलेल्या किमान पाठिंबा मूल्यांचा ग्राहकांवर होणारा परिणाम या सर्व बाबी शिफारशी करतांना लक्षात घेण्यात आल्या आहेत.
 

नरेंद्र मोदी narendra modi खोबरे Copra कृषी मूल्‍य आणि किंमत आयोग CACP coconut नारळ
English Summary: Cabinet approves hike in MSP for Copra

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.