1. बातम्या

वर्षाला ७५ लाख रुपये देऊन दोन मित्रांनी करार तत्वाने १३० एकरात घेतलं डाळिंबाचं उत्पन्न

देशात सध्या कृषी कायद्यांवरुन शेतकरी आंदोलन चालू आहे.यात एक कायदा हा करार शेतीविषयीचा आहे. या कायद्याला विरोध करत आहेत, करार शेतीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून शेती बड्या उद्योजकांच्या हाताखाली जाईल असा दावा केला जात आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

देशात सध्या कृषी कायद्यांवरुन  शेतकरी आंदोलन चालू आहे.यात एक कायदा हा करार शेतीविषयीचा आहे. या कायद्याला विरोध करत आहेत, करार शेतीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून शेती बड्या उद्योजकांच्या हाताखाली जाईल, असा दावा केला जात आहे.

पण आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्यांविषयी माहिती देणार आहोत ज्यांनी करार शेती करुन त्यांनी आपलं नशीब पालटलं आहे. हे शेती बारामती शहारापासून काही अंतरावर आहे.  महाराष्ट्रात बारामती पासून 35 किलोमीटर अंतरावर आणि भिगवणच्या अगदी जवळ असलेल्या ठिकाणी दोन सामान्य शेतकऱ्यांनी केला आहे. या करार शेतीचा अवलंब करून त्यांनी आपल्या पुढे नवीन उदाहरण ठेवले आहे. अंकुश पडवळे आणि अमरजित जगताप या शेतकऱ्यांनी 130 एकरमध्ये डाळिंबाचा पीक घेतले आहे.

या दोघांनी स्वतः बरोबर तरूणांदेखील आपल्या बरोबर घेतले. त्यांनी या आधी बरेच नविन प्रयोग केले. शेडनेड हाऊस मधली शेती, कमी पाण्यावरच शेती, पावसाच्या प्रत्येक थेंबाच गणित, पाणी बचत, झाडाच्या पाण्याच बाष्पीभवन कस करायचे वगैरे.अंकूश पडवळे हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे आहेत तर अमरजित जगताप हे पंढरपूर मधील वाखरी गावाचे आहेत. त्यांचे Bsc.Agriculture झाले असून अंकूश पडवळे यांनी MA BEd केले आहे.

 

पडवळे यांनी एवढ शिक्षण घेऊनही त्यांना शेतीची आवड फार म्हणून त्यांनी या दुष्काळी प्रदेशात चालून आलेल्या नौकरीच्या संधी डावलून शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मंगळवेढ्याच्या खुपसंगी गावाचे असणारे पडवळे यांच्या वडिलांपासून शेती हाच मुख्य उद्योग घरात होता. पण त्यांची सगळी शेती ही सावकारी पाशात अडकलेली होती. पण यातूनही मार्ग काढून त्यांनी शेतीच करण्याचा निर्णय घेतला.

खुपसंगी हे पावसाच्या पाण्यातलं दुष्काळी गाव. जेथे पावसाच्या पाण्यावरच शेती केली जाते. अश्या या दुष्काळी पट्टयात शेती कारण म्हणजे जिकीरीच च काम होत. तरीही त्यांनी माघार न घेता नवीन प्रयोग चालूच ठेवले. शेतीला पाणी नाही म्हणून ते थांबले नाहीत. करार शेती चा हा निर्णय तास खूप च धाडसाचं होता. पण त्यांनी ते करून दाखवले. पडवळे यांना कृषी भूषण पुरस्कार २०१६ तसेच बारामतीकृषि विज्ञान केंद्राचा पहिला पुरस्कार देखील मिळाला आहे.या सामान्य शेतकऱ्यांनी करार शेती करून अख्या महाराष्ट्रासमोर एक उत्तम उदाहरच उभे केला आहे. हा करार त्यांनी दिपक फेर्टीलिझर्स नी ढोले पाटीलांकडून लीज वर घेतलेल्या या जमिनीवर शेती करण्यास सुरुवात केली. हा तब्बल 62 लाख रुपायांचा वार्षिक करार आहे.

 

 काय आहे ही करार शेती?

शेती करण्याच्या विविध पद्धतींपैकी असणारी ही करार शेती ग्राहकांच्या गरजा समोर ठेवून केली जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादकांकडून उत्पादन तयार करून घेतले जाते. यात एखादा मध्यस्थ, संस्था किंवा कंपनी शेतकऱ्यांशी करार करते. या शेतीत मुख्यतः मागणी तसा पुरवठा हे समीकरण महत्वाचे आहे.

English Summary: By paying Rs. 75 lakhs a year, two friends took pomegranate income in 130 acres on contract basis Published on: 27 February 2021, 03:33 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters