जर तुम्हाला तुमच्या गावात व्यवसाय उभारायचा असेल तर तुमच्यासाठी आम्ही काही भन्नाट आयडिया देत आहोत. याच्या मदतीने तुम्ही आपला नवीन व्यवसाय सुरु करु शकतात. विशेष म्हणजे या व्यवसायासाठीची गुंतवणूक फार कमी आहे. गुंतवणूक जास्त करावी लागते म्हणून अनेक जण व्यावसायाचा विचार करत नाहीत. परंतु आम्ही ज्या व्यवसायाचे काही कल्पना देत आहोत, ते अगदी पाच ते सहा हजार रुपयांत करता येतील. पण नफा मात्र बक्कळ कमवता येणार आहे.
इको - फ्रेंडली न्यूज- पेपर बॅग - या बॅगची मागणी भारतीय बाजारात अधिक आहे. बॅग बनविण्याचा व्यवसाय केला तर नक्कीच आपल्या फायद्याचा ठरेल. या व्यवसायातील गुंतवणूक फार कमी आहे.
योगा टीचर (Yoga Teacher)
योगा शिक्षक- सध्याच्या जीवनशैलीमुळे अनेकजण ताण- तणावात राहत असतात. यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या येत असतात. यामुळे जर आपण योगा करण्यामध्ये आपले प्राविण्य असेल तर तुम्ही योगाचे क्लासेस चालू करु शकतात. यासाठी योगाचे प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे.
(Clothes Ironing Service)इस्त्री करण्याचा व्यवसाय - हा व्यवसायही कमी गुंतवणूकीत सुरू होणारा आहे. या व्यवसायासाठी आपल्याला ग्राहकांच्या पाठी जाण्याची गरज नाही. ग्राहक स्वता हून आपले कपडे इस्त्री करण्यास येत असतात.
Share your comments