1. बातम्या

Business: फक्त 10 हजार रुपयात सुरू करा 'हा' व्यवसाय, वर्षभर होईल कमाई

आजकाल बरेच लोक छोटमोठे व्यवसाय सुरू करून आपला फायदा करून घेत असतात. या व्यावसायिक लोकांना कमी गुंतवणुकीमद्धे जास्त परतावा देणारा व्यवसाय माहीत असणे गरजेचे आहे. अशाच एका व्यवसायबद्दल आपण जाणून घेऊया.

Business

Business

आजकाल बरेच लोक छोटमोठे व्यवसाय सुरू करून आपला फायदा करून घेत असतात. या लोकांना कमी गुंतवणुकीमद्धे जास्त परतावा देणारा व्यवसाय माहीत असणे गरजेचे असते. अशाच एका व्यवसायबद्दल आपण जाणून घेऊया.

पण जर तुम्हाला कोणता व्यवसाय (Business) सुरू करायचा हे ठरवता येत नसेल, तर तुम्ही स्टेशनरी व्यवसाय (Stationary Business) सुरू करू शकता. शाळा-कॉलेजांच्या आसपासच्या स्टेशनरीच्या दुकानांवर तुम्हाला अनेकदा गर्दी पाहायला मिळते. स्टेशनरी वस्तूंना खूप मागणी आहे.

हा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. स्टेशनरी उत्पादनाची मागणी जास्त आहे. जसे की पेन, पेन्सिल, नोटपॅड इत्यादी स्टेशनरी वस्तू आहेत. यासोबतच तुम्ही तुमच्या स्टेशनरीच्या दुकानात लग्नपत्रिका, भेटकार्ड यांसारख्या वस्तूही विकू शकता.

हे ही वाचा 
Solar Panel: शेतकरी मित्रांनो; सोलर पॅनल बसवून मिळवा 24 तास मोफत वीज, सरकार देतंय 'इतके' अनुदान

जर तुम्ही स्टेशनरीचे दुकान उघडणार असाल तर सर्वप्रथम तुम्हाला 'शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट' अंतर्गत नोंदणी करावी लागेल. स्टेशनरी दुकान उघडण्यासाठी 300 ते 400 चौरस मीटर जागा आवश्यक आहे.

इतके पैसे खर्च करावे लागतील

स्टेशनरी व्यवसाय असा आहे, जो तुम्ही कमी भांडवल गुंतवूनही उघडू शकता. एक उत्तम स्टेशनरी दुकान उघडण्यासाठी तुम्हाला किमान 50 ते 60 हजार रुपये खर्च करावे लागतील.

हे ही वाचा 
Kisan Credit Card: ...आणि शेतकरी वडिलांच्या मृत्यूनंतर बँकेने मुलाला दिले 15 लाख रुपये; जाणून घ्या नेमकं प्रकरण

दुकान उघडण्यासाठी ठिकाण खूप महत्त्वाचं असतं. स्टेशनरी दुकान फक्त शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या आसपास उघडा. जर तुम्ही तुमच्या दुकानात स्टेशनरीची ब्रँडेड उत्पादनं विकत असाल तर तुमची 30 ते 40 टक्के बचत होऊ शकते. त्याच वेळी, स्थानिक उत्पादनावर तुमची कमाई दोन ते तीन पट असेल.

जर तुमच्याकडे या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी मोठे भांडवल नसेल तर तुम्ही 10 हजार रुपयांमध्येही हा व्यवसाय सुरू करू शकता. एक लाख रुपये गुंतवून स्टेशनरी दुकान उघडलं तर तुम्ही एका महिन्यात 40 हजार रुपये सहज कमवू शकता.

महत्वाच्या बातम्या 
Fish Rice Farming: मत्स्य भातशेतीतून शेतकरी कमवतोय दुप्पट पैसा; जाणून घ्या 'या' शेतीबद्दल
Monkeypox: मंकीपॉक्सचा कहर जगासाठी धोकादायक; 'ही' लक्षणे आढळल्यास त्वरित करा उपाय
Fertilizers: आता भेसळयुक्त खते एका मिनिटातच समजणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

English Summary: Business just 10 thousand rupees year Published on: 28 July 2022, 06:46 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters