MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

Business Idea : 25 हजारातून सुरू केलेल्या व्यवसायातून कमाई होईल दीड लाख रुपयांची

कोरोना काळात नोकरी मिळणं कठीण झालं आहे. बहुतेकजण बेरोजगार झाले आहेत. यामुळे शहरात नोकरी करणारे अनेकजण व्यवसायाकडे वळले आहेत. शेती व्यवसायाबरोबर आपण जोड व्यवसाय करणे आवश्यक आहे. ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे, अशा लोकांसाठी आम्ही एक बिझनेस आयडिया देत आहोत.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

कोरोना काळात नोकरी मिळणं कठीण झालं आहे. बहुतेकजण बेरोजगार झाले आहेत. यामुळे शहरात नोकरी करणारे अनेकजण व्यवसायाकडे वळले आहेत. शेती व्यवसायाबरोबर आपण जोड व्यवसाय करणे आवश्यक आहे. ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे, अशा लोकांसाठी आम्ही एक बिझनेस आयडिया देत आहोत.

व्यवसाय सुरू करायचा म्हटला म्हणजे, अनेकांना गुंतवणूकीची मोठी अडचण सतावत असते. गुंतवणूक मोठी असली तर व्यवसाय सुरू करण्याचा विचार अनेकजण सोडून देत असतात. पण आम्ही तुम्हाला ज्या व्यवसायाची कल्पना देणार आहोत त्यातील गुंतवणूक मात्र फक्त 25 हजार रुपये आहे. इतक्याशा गुंतवणुकीतून तुम्ही लाखो रुपये कमावू शकतात. नोकरीतून आपल्याला लाखो रुपये कमावण्यासाठी वर्षभर काम करावे लागते. परंतु व्यवसायातून आपण काही महिन्यातच लाख रुपयांची कमाई करू शकतो. हा व्यवसाय आहे, पोहा तयार करण्याचा (Poha manufacturing unit)

पोहा मॅन्‍युफॅक्‍चरिंग यूनिट

पोहा एक पौष्टिक खाद्यपदार्थ आहे, जे न्याहारीमध्ये अधिक खाल्ले जाते. मॅन्‍युफॅक्‍चरिंग यूनिट टाकून आपण बक्कळ कमाई करू शकतो. भारतात याची मोठी मागणी आहे. पोहा तयार करणे अगदी सोपे आहे. म्हणूनच त्याची मागणी आणि विक्री प्रचंड वाढली आहे. पोहाची मागणी वाढली असल्याने आपण यातून मोठी कमाई करू शकतो असं म्हणू शकतो.

 

किती येणार खर्च

खादी व ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) पोहा व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालात असे सांगितले गेले आहे की पोहा बनविण्याच्या युनिटची किंमत अडीच लाख रुपयांपर्यंत असू शकते. परंतु यासाठी तुम्हाला सरकारकडून 90% पर्यंत कर्ज मिळेल. अशा प्रकारे, सुरुवातीला आपल्याला फक्त 25 हजार रुपयांची व्यवस्था करावी लागेल. उरलेले पैसे कर्जावर उपलब्ध असतील जे तुम्ही थोड्या वेळाने परत करत रहा

कोणत्या गोष्टी आवश्यक असतील

आपल्या जवळ सुमारे 500 चौरस फूट जागा असावी. याशिवाय पोहा मशीन, सेव्हज आणि भाटी व्यतिरिक्त तुम्हाला पॅकिंग मशीन, ड्रम व इतर लहान वस्तू आणाव्या लागतील. केव्हीआयसीने सादर केलेल्या अहवालानुसार कच्चा माल आणा. सुरूवातीस थोडी सामग्री आणा आणि नंतर हळूहळू प्रमाण वाढवा.

लाखो रुपयात होईल कमाई

पोहा बनवण्याच्या धंद्यात तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. कर्जाचा प्रश्न असेल तर, आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागेल. मग आपण ग्रामीण उद्योग रोजगार योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज करा. केव्हीआयसी ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज देते.

 

मुद्रा योजनेंतर्गत कर्ज

जर आपल्याला पैशांची गरज असेल तर सरकारची मुद्रा योजना आपल्यास मोठ्या प्रमाणात मदत करू शकते. या योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कर्ज उपलब्ध आहे. परंतु जर बँक कर्ज देण्यास नकार देत असेल तर आपण त्याबद्दल तक्रार देखील करू शकता. मुद्रा योजनेंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले जाऊ शकते.

English Summary: Business Idea : The business started from Rs 25,000 will generate an income of Rs 1.5 lakh Published on: 24 July 2021, 09:16 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters