1. बातम्या

Business idea : मत्स्य व्यवसाय कमी जागेत मिळवा चांगला नफा

शेतीसोबत अनेक जोडधंदे करता येतात. अशाच एका जोडधंद्याची माहिती आपण आज घेणार आहोत. या मधून आपण चांगला आर्थिक नफा मिळवू शकतो. मत्स्य व्यवसाय शेतकऱ्यांसाठी पूरक ठरणार आहे. त्याचबरोबर महिलांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Fishing business

Fishing business

शेतीसोबत अनेक जोडधंदे करता येतात. अशाच एका जोडधंद्याची माहिती आपण आज घेणार आहोत. या मधून आपण चांगला आर्थिक नफा मिळवू शकतो. मत्स्य व्यवसाय शेतकऱ्यांसाठी पूरक ठरणार आहे. त्याचबरोबर महिलांसाठी फायदेशीर ठरणार आहे. आज आपण कमी जागेत मत्स्य व्यवसाय कसा करावा याबाबत माहिती घेणार आहोत.

मत्स्य व्यवसाय साठी टॅंक कशे उभारावेत

व्यवसाय करताना तुम्हाला शेततळे तसेच रायनो मेट द्वारे छोटे छोटे कमी जागेत गोलाकार टॅंक बनवून घ्यावे. आपल्या जागेनुसार तुम्ही दहा फूट किंवा त्यापेक्षा जास्त परीघ असणारी गोलाकार टँक्स बनवून घेऊ शकता. यामध्ये गोलाकार साईटने अँगलचा राऊंड करून मधल्या साईटला आत मध्ये स्लोप करू शकता. ज्याने टँकमधील घाण मधल्या मध्ये जमा व्हावी असेल तसेच तुम्हाला त्यावर प्लॅस्टिक पेपरवर रायनो मॅट टाकून तुम्हाला टॅंक बनवायचा आहे. ज्यामध्ये 10 ते 15 हजार लिटर पाणी बसते अश्या पद्धतीने तुम्ही टॅंक तयार करायचा आहे. यामधील दररोज कमीत कमाई ३ ते ४ फूट पाणी तुम्हाला बदलायचे आहे. जमा होणाऱ्या घाणीचे आउटलेट काढायचे आहे.

मत्स्य व्यवसाय माशांची निवड

माशांची निवड यामध्ये तुम्ही तिलापिया कटला, रोहू, मृगळ या जातीच्या मासे चे उत्पन्नघेऊ शकता. ज्यामध्ये तिलापिया जातीचा मासा तुम्ही चार महिन्यात जवळपास अडीशे ते तीनशे ग्रॅम पर्यंत त्याची वजन वाढते. हा मासा प्रोटीन युक्त आहे. त्यामुळे याची मागणी जास्त आहे. सदर विचार करता महिना पंधरा ते वीस हजार रुपये तुम्ही या माध्यमातून कमवू शकता. व्यवसाय चालू करण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो.

ज्यामध्ये माशांसाठी फीड लागेल यात प्रोटीन असते जे की वेगळ्या सुकट व इत्यादी पदार्थ पासून बनलेली असते ते साधारण ५० ते ८० किलो प्रमाणे असते व माश्यांचे बीज एक रुपया ते पाच रुपये असे वेगवेगळ्या किमतीनुसार असतात. एकूण भांडवल १ ते २ लाख रूपये लागते. लागणार कच्चा माल (इतर गोष्टी) टॅंक बनवण्यासाठी मटेरियल, माश्यांसाठी फीड लागते. हे मार्केटमधून वेगवेगळ्या ठिकाणावरून मिळते. मनुष्यब १ ते २ लागतात. मच्छी मार्केटमधील व्यापाऱ्यांना तुम्ही होलसेल मध्ये विकू शकता, किंवा स्वतः एकमाणूस लावून मार्केटमध्ये विकू शकता.

English Summary: Business idea: Get good profit in less space Published on: 27 January 2022, 10:55 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters