Bus Accident : आताची सर्वात मोठी बातमी...जुन्या पुणे-मुंबई हायवेवर खोपोलीजवळ बोरघाटात खासगी बस दरीत कोसळल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 28 जण जखमी आहेत.
बोरघाटातल्या शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला. ही खासगी बस पुण्याहून मुंबईला येत होती. तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळली.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आज सकाळी पहाटे ४ च्या सुमारास एक खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. ही घटना बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ घडली. या घटनेत १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी होते.
या घटनेत २० ते २५ लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या बस मध्ये बाजीप्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव येथील कार्यकर्ते होते. हे सर्व पुण्यात शुक्रवारी झालेला कार्यक्रम संपवून परत जात असताना ही घटना घडली आहे. ही बस तब्बल ४० ते ५० फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे.
या अपघात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे अद्याप समजू शकली नाही. गोरेगाव येथील बाजी प्रभू वादक ग्रुप हा पिंपरीचिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी आला होता. या पथकात ४ ते पाच मुली आणि ४० मुले होती. काल रात्री ते गोरेगाव सुखकर्ता ट्रॅव्हल्सच्या खासगी बसने पुण्याहून मुंबईला निघाले होते.
पावसाबाबत मोठी बातमी! पुढचे 4 दिवस 'या' ठिकाणी जोरदार पाऊस
बस चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी आणि स्थानिकांनी बचाव कार्य सुरू केले आहे. आत्तापर्यंत १७ प्रवाशांना दरितून बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेत सात ते आठ जण ठार झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू आहे.
केंद्र सरकार पीक विमा योजनेत बदल करू शकते, नवीन स्वरूप कसे असेल ते जाणून घ्या
Share your comments