1. बातम्या

बैलगाडा शर्यतीबंदी लवकर उठण्याची आशा

पुणे : बैलगाडा शर्यतबंदीवर पुन्हा नव्याने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार दिली आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकिट हा मुद्दा गाजला होता.

KJ Staff
KJ Staff


पुणे : बैलगाडा  शर्यतबंदीवर   पुन्हा नव्याने न्यायालयात प्रतिज्ञापत्र  सादर करा असे आदेश  राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार दिली आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकिट हा मुद्दा गाजला होता.

मुंबईत झालेल्या बैठकीनंतर बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे मंत्री सुनील केदार यांनी दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी लवकर व्हावी यासाठी महाधिवक्ता आशिष कुंभकोणी यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासनही दिल्याची माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी बैलगाडा शर्यत बंदी उठविण्याबाबत रणनीती ठरविण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकी विषयी डॉ. कोल्हे यांनी ही माहिती दिली. या बैठकीला माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, बैलगाडा संघटनेचे बाळासाहेब आरूटे, नितीन शेवाळे, धनाजी शिंदे, संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर, अमोल हरपळे आणि पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. परकाळे, सहआयुक्त डॉ. प्रशांत भड, अवरसचिव डॉ. सं. श्री. पंचपोर, सहसचिव माणिक गुट्टे आदी उपस्थित होते.

English Summary: bulk cart race hopes to start soon Published on: 15 August 2020, 04:49 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters