शेतकरी आपल्या शेतीवर आणि मातीवर खूप प्रेम करत असतो. तसेच शेतकरी आपल्या जनावरांना खूप जीव लावत असतो. याची अनेक उदाहरणे आपण बघत आली आहे. असे असताना अलीकडे लग्नात अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. हौस म्हणून अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने लग्न करत असतात. यात शेतकरी कुटूंबातील लग्न मात्र अजूनही साध्या पद्धतीने केले जाते. मात्र काही शेतकरी याला अपवाद देखील ठरतात.
से असताना आता सोशल मीडियावर एक विडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा विडिओ एका दूध उत्पादक नवरदेव शेतकऱ्याचा आहे. या व्हिडिओत चक्क नवरदेवच बाशिंग बांधलेलं असताना म्हशींचं दूध काढताना दिसून येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील हा भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, यामध्ये हळद लागलेला नवरदेव कपाळावर बाशिंग बांधून म्हशीचे दूध काढत आहे. यामुळे याची चर्चा सध्या रंगली आहे.
मोताळा तालुक्यातील कोल्ही गवळी येथील नवरदेवाला चक्क नानमुखाच्या दिवशी वऱ्हाडींना सोडून म्हशीचे दूध काढावे लागले. यामुळे अशी काय अडचण होती की स्वतः नवरदेवालाच धारा काढाव्या लागल्या आहेत. असा प्रश्न अनेकांना पडला असेल. अनेकदा गाय किंवा म्हैस ही शेतकऱ्यांच्या घरातील ठराविक लोकांनाच दूध काढू देते, असा प्रकार अनेकदा बघायला मिळतो. यामुळे शेतकऱ्यांची अनेकदा अडचण होते, कुठेही गेलं तरी धारा काढायला घरी यावच लागत.
'बंद पडलेल्या कारखान्याला धुऊन खाण्याचे काही लोकांचे काम'
आता असाच प्रकार मोताळा तालुक्यातील कोल्ही गवळी येथे घडला. प्रतीक बोराळे याचा विवाह होता, यामुळे नानमुखाचा कार्यक्रम असताना म्हैस मात्र त्याला एकट्यालाच दूध काढू देत असल्याने त्याला वऱ्हाडी सोडून गोठ्यात म्हशीचे दूध काढण्यास जावे लागले. यामुळे याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे या नवरदेवाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
यामुळे आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहत कपाळावर लग्नाचं बाशिंग, अंगात पिवळा कुर्ता आणि पायात कोल्हापूरी चप्पल, असून देखील नवरदेवाने या म्हशीचं दूध काढले आहे. व्यवसायाशी प्रामाणिक असलेल्या प्रतीकनेही तितक्याच निष्ठेने म्हशीचे दूध काढले आहे. कोणतीही परिस्थिती असली तरी शेतकऱ्याला आपली कामे करावीच लागतात, हे यावरून दिसून येते.
महत्वाच्या बातम्या;
टोमॅटो आणि पेट्रोलचे दर सारखेच, शेतकरी त्रस्त व्यापारीच मालामाल
हवामान अपडेट: शेतकऱ्यांनो आजपासून मान्सून होणार दाखल, केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरु..
IoTech World Avigation कंपनीने लॉन्च केला सर्वोत्तम बाइक ड्रोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत
Share your comments