1. बातम्या

अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्प सादर; पाहा काय आहेत घोषणा

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा कायमस्वरुपी राबविणार. कृती आराखड्यात संकेतस्थळांचा विकास, सुलभ जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयीसुविधा, गुंतवणुकीचा प्रसार, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदींचा समावेश.

Budget 2025-26 News

Budget 2025-26 News

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी २०२५-२६ साठी अर्थसंकल्प सादर केला आहे. अजित पवार यांनी आज अर्थमंत्री म्हणून ११ व्यादा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासचक्राला चालना देण्यासाठी खासगी तसेच शासकीय गुंतवणूक, नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या चार प्रमुख घटकांमध्ये वृद्धी होणे आवश्यक आहे असं अजित पवारांनी यावेळी म्हटलं.

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे:

महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही !

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा कायमस्वरुपी राबविणार. कृती आराखड्यात संकेतस्थळांचा विकास, सुलभ जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयीसुविधा, गुंतवणुकीचा प्रसार, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदींचा समावेश.

उद्योग विकास :
महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार, त्यानुसार वर्षाच्या कालावधीत ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ५० लाख रोजगार निर्मिती

केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार

10 हजार एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करणार

मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचेग्रोथ हबम्हणून विकसित करणार, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर विरार - बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण करणार, मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था १४० बिलीयन डॉलरवरून सन 2030 पर्यंत ३०० बिलीयन डॉलर, तर सन 2047 पर्यंत 1.5 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट

गडचिरोली जिल्हास्टील हबम्हणून उदयास येणार, गडचिरोली जिल्ह्यातील खनिकर्म महामार्गांचे जाळे विकसित करण्याकरिता पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपये

सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत 6 हजार 400 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान

ऊर्जा क्षेत्रातील नियोजन कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत

राज्यातमहाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशनची स्थापना

नागपूर येथेअर्बन हाट केंद्रांची स्थापना

नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर-इनोव्हेशन सिटी

पायाभूत सुविधा विकास
पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराच्या विकासात राज्य शासनाचा 26 टक्के सहभाग

वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ, वाढवण बंदराजवळ मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानक, हे बंदर समृध्दी महामार्गालाही जोडणार

काशिद- जिल्हा रायगड येथील तरंगत्या जेट्टीचे काम लवकरच सुरु होणार

गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून मांडवा, एलिफंटापर्यंत प्रवासाकरिता बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन धोरण

महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये 8 हजार 400 कोटी रुपये किंमतीचा बाह्यसहाय्यित शोअर प्रकल्प

महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व्यवस्थापन या 450 कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे 158 कोटी रुपये किंमतीच्या कामांना मान्यता

अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047 तयार करणार

आशियाई विकास बँक प्रकल्प, टप्पा-3 अंतर्गत 755 किलोमीटर रस्ते लांबीची 6 हजार 589 कोटी रुपये किंमतीची 23 कामे हाती घेणार.

सुधारित हायब्रीड ॲन्युईटी योजनेअंतर्गत 36 हजार 964 कोटी रुपये किंमतीची 6 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -3, सन 2025-26 साठी 1500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे उद्दीष्ट

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-3, एक हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या 3,582 गावांना 14 हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना, राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांना जोडणार-प्रकल्प किंमत 30 हजार 100 कोटी रूपये

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गालगत अ‍ॅग्रो-लॉजिस्टिक हब विकसित करणार, प्रामुख्याने विदर्भ मराठवाड्यातील शेतक-यांना होणार

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या 86 हजार 300 कोटी रुपये किंमतीच्या 760 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाची भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर

ठाणे ते नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग उभारणार.

स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू- वांद्रे ते वर्सोवा- 14 किलोमीटर लांबीचे, 18 हजार 120 कोटी रुपये खर्चाचे काम मे, 2028 पर्यंत पूर्ण करणार

उत्तन ते विरार सागरी सेतू जोडरस्त्यांचा 55 किलोमीटर लांबीचा 87 हजार 427 कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प हाती घेणार

पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेणार

तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग- 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित

English Summary: Budget presented by Finance Minister See what the announcements are ajit pawar news Published on: 10 March 2025, 04:43 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters