Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यंदाचा अर्थसंकल्प (Budget 2022) पूर्णपणे डिजिटल असणार आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांचा पोतडीतून काय निघणार असं बोलण्याऐवजी त्यांचा टॅबमधून कुठल्या क्षेत्रासाठी काय तरतूद असणार आहे हे पाहावं लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. कोरोना संसर्गाच्या काळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे यंदाही आरोग्य क्षेत्रासाठी अधिक तरतूद राहण्याची शक्यता आहे.
निर्मला सितारमण यंदाच्या अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारत अभियानाला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. नोकरदार,उद्योजक, शेतकरी, आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्प कसा राहणार हे पाहायला लागणार आहे. कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था खालावली आहे. ती आगामी आर्थिक वर्षांतील (२०२२-२३) संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्याइतकी मजबूत होऊ लागली आहे.
नव्या आर्थिक वर्षांत राष्ट्रीय उत्पादनाचा वेग म्हणजे विकासदर ८ ते ८.५ टक्के राहू शकेल, असा आशावादी सूर यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये उमटला आहे. दरम्यान अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारामन संसदेत दाखल झाल्या आहेत. कोरोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यस्थेला या अर्थसंकल्पामुळे गती मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Share your comments