1. बातम्या

Budget 2021 : ६४,१८० कोटींच्या ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ योजनेची घोषणा; शेतमालाला मिळेल दीडपट हमीभाव

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीला केंद्र सरकारने करोना संकटात केलेल्या मदतीची माहिती दिली.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
budget 2021

budget 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीला केंद्र सरकारने करोना संकटात केलेल्या मदतीची माहिती दिली. तसंच लवकरच करोना प्रतिबंधक आणखी दोन लस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

याशिवाय त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी  दिली आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट दरम्यान ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ या नव्या योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी पुढील सहा वर्षांसाठी ६४,१८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय आरोग्य योजनेच्या व्यतिरिक्त ही तरतूद असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.या योजनेंतर्गत गावापासून शहरापर्यंत आरोग्य सुविधा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत. यासह शेतकऱ्यांनाही सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

आमचं सरकार शेतकरी हितासाठी वचनबद्ध आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचे सरकारचे उद्दीष्ट असून गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरता तरतूद असल्याची निर्मला सीतारामन म्हणाल्या.  आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेंतर्गत प्रतिबंधात्मक, गुणकारी, कल्याणकारी आरोग्य सेवेवर भर दिला जाणार आहे. या योजनेसाठी दिलेला निधी प्राथमिक स्तरापासून ते उच्च स्तरावरील आरोग्य सेवा विकसित करण्यासाठी खर्च केला जाणार आहे.

 

त्याचबरोबर नव्या आजारांवर लक्ष ठेवलं जाणार आहे. याद्वारे ७५ हजार ग्रामीण आरोग्य केंद्र, सर्व जिल्ह्यामध्ये चाचणी केंद्र, ६०२ जिल्ह्यांमध्ये क्रिटिकल केअर हॉस्पिटल, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र तसेच इंटिग्रेटेड आरोग्य माहिती पोर्टल अधिक सक्षम केलं जाणार आहे.तसेच नवी १७ सार्वजनिक आरोग्य केंद्र उघडली जाणार आहेत. ३२ विमानतळांवरही याची निर्मिती केली जाणार आहे. त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड हेल्थची निर्मिती, ९ बायोलॅबची निर्मिती तर चार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजींची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी अर्थमंत्री सीतारामन यांनी केली.

असंघटित मजुरांसाठी ऑनलाइन पोर्टल तयार करणार 

उज्ज्वला योजना १ कोटी अजून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणार. गॅस वितरण नेटवर्कमध्ये पुढील तीन वर्षात अजून १०० जिल्हे जोडणार आहोत. जम्मू काश्मीरमध्ये गॅस पाइपलाइन प्रोजेक्ट सुरु केला जाईल.

गव्हाचं उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांचा फायदा

२०१२ मध्ये शेतकऱ्यांना किमान हमीभावापोटी ३३ हजार कोटी रुपये दिले होते, २०१५ मध्ये शेतकऱ्यांना ५२ हजार कोटी रुपये दिले तर २०२०-२१ मध्ये हा आकडा ७५ हजार कोटी वाढला. गव्हाचं उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

बँकांमधील लोकांचा पैसा सुरक्षित राहावा यासाठी सरकारी बँकांसाठी २० हजार कोटींची तरतूद.

जल जीवन मिशन योजनेसाठी दोन लाख ८७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारण्यासाठी तरतूद.

नवीन आरोग्य योजनांवर ६४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली असून १५ अत्यावश्यक आरोग्य केंद्रं आणि दोन मोबाईल हॉस्पिटल्सची घोषणा करण्यात आली आहे.

आत्मनिर्भर भारत पॅकेजेसमुळे जो आर्थिक सकारात्मक परिणाम झाला तो २७.१ लाख कोटी रुपयांचा म्हणजे जीडीपीच्या १३ टक्क्यांपेक्षा जास्त होता.

विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून वाढवून ७४ टक्के करणार .

निर्मला सीतारामन  यांनी जुन्या वाहनांसाठी 'स्क्रॅपिंग पॉलिसी' जाहीर केली आहे. २० वर्षांनी खासगी वाहनांसाठी तर व्यवसायिक वाहनांची १५ वर्षांनी फिटनेस टेस्ट होईल अशी माहिती त्यांनी दिली.

 

तामिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये महामार्गांच्या कामांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. आगामी काळात येथे निवडणुका होणार आहेत. याशिवाय पश्चिम बंगालमधील महामार्गांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक लाख ७८ हजार कोटींचा निधी.

मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद.

२०३० पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य डोळ्यांसमोर असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. रेल्वेला पायाभूत सुविधांसाठी १.१० लाख कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीची तरतूद असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

English Summary: Budget 2021: Rs 64,180 crore 'self-reliant healthy India' scheme announced, agriculture to get half price guarantee Published on: 01 February 2021, 01:32 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters