bullock cart wedding
पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव येथे एक अनोखा पारंपरिक विवाह सोहळा पार पडला. देवेंद्र भवर आणि पल्लवी गाडेकर यांच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने चारचाकीतून नव्हे तर २० बैलगाड्यातून वऱ्हाडी मंडळी आले होते. विशेष म्हणजे लग्नात डीजेचा आवाज न करता टाळ मृदूंगाचा नाद करत वारकरी वऱ्हाडाच्या रूपाने दाखल झाले होते.
सनईचे सप्तसूर, डोईवर तुळस घेऊन चाललेल्या महिला आणि थेट हातात वीणा घेतलेला नवरदेव या लग्नात पाहायला मिळाला. वारकरी संप्रदायाची परंपरा जपत वराने संत तुकाराम महाराजांची वेशभूषा आणि वधूने जिजाऊंची वेशभूषा परिधान केली होती. जुन्या काळात ज्या पद्धतीने बैलगाडीतून वऱ्हाडी मंडळी यायचे त्याचीच आठवण या लग्नात झाली.
केळीच्या नामशेष होणाऱ्या प्रजातीचा पुनर्विकास, आता शेतकऱ्यांची लाखोंची कमाई होणार
पल्लवीचे वडील गंगाधर गाडेकर महाराज हे नेहमीच कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत असतात. मात्र आपल्या मुलीचा विवाह देखील असाच डीजे विरहित, वाहनांमधून होणारे प्रदूषण थांबवत व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी अनोख्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न केलाय.
अंडी-चिकन व्यवसायात दुप्पट नफा होणार, आजच RIR जातीची कोंबडी खरेदी करा
सध्या आपल्याकडे लग्न म्हटलं की मोठा खर्च तसेच अनेक वेगवेळ्या प्रथा देखील मोडून आधुनिक पद्धतीने लग्न करावे लागले आहेत. यामुळे जुन्या परंपरा देखील आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
महत्वाच्या बातम्या;
मोदी सरकार २ हजार रुपये परत घेणार, शेतकऱ्यांकडून 100 कोटी वसूल करणार
कोरफडीची शेती करून वर्षाला कमवा 10 लाख, जाणून घ्या शेती कशी करावी
भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश, जागतिक दूध उत्पादनात 24% वाटा
Share your comments