शेतकरी आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी नेहेमी चर्चेत असतात. आता मात्र त्यांचे पुत्र चर्चेत आले आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी शिवाजी विद्यापीठामध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह सौरभ शेट्टी यांनी आंदोलन केले होते.
आता कोल्हापूर येथील इचलकरंजी डिकेटीई ही शिक्षण संस्था ऑटोनोमस असल्याने या संस्थेअंतर्गत होणाऱ्या सर्व परिक्षा महाविद्यालय अंतर्गत घेतल्या जातात. यामध्ये मात्र जे विद्यार्थी नापास होतात त्यांना वर्षातून तीन वेळा परिक्षा देण्याची परवानगी आहे.
मात्र याठिकाणी तसे होत नसल्याने मुलांचे वर्ष वाया जात आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विद्यार्थी परिषदेच्या वतीने मागच्या दोन दिवसांपासून करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
ढसाढसा रडत शेतकऱ्यांनी थेट धरले अधिकाऱ्यांचे पाय, जाणून घ्या नेमकं काय घडलं...
असे असताना माजी खासदार राजू शेट्टी यांचे चिरंजीव सौरभ शेट्टी यांना गाव भाग पोलिसांनी अटक केले आहे. स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे युवक डीकेटीई या संस्थेच्या दारात आदोलनासाठी बसले होते. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत.
यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान काल महाविद्यालय आणि स्वाभिमानी विद्यार्थी परिषद यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली. यामुळे विद्यार्थी अजूनच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन! इथेनॉलमुळे कारखान्यांची परिस्थिती सुधारणार
दरम्यान, कालपासून डीकेटीई कॉलेजसमोर विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू होते. या कारणावरून पोलिसांनी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थांना ताब्यात घेतले. आता यावर काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
राजू शेट्टी यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण, चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित
पपई उत्पादक शेतकरी अडचणीत, व्हायरसच्या हल्ल्यात बागा उद्ध्वस्त
नाशिक येथील १५ व्या कृषीथॉनमध्ये बीकेटीने केले जागतिक दर्जाच्या कृषी उत्पादनांचे अनावरण
Share your comments