खरीप हंगामाचे जरी निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले असले तरी वाढत्या दरात हे नुकसान शेतकऱ्यांनी भरून काढले आहे. सोयाबीन पिकाला जरी सरासरी दर मिळत असला तरी कापसाला विक्रमी दर मिळाला आहे त्यामुळे उत्पादनावर झालेला खर्च यामधून भरून निघाला आहे. मागील ५० वर्षात कापसाला एवढा दर मिळाला नाही तेवढा दर यंदा कापसाला मिळाला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनी वाढत्या दरामुळे फरदड पिकातून चांगले उत्पादन मिळाले आहे. मागील १५ दिवसामध्ये १ हजार ५०० क्विंटल बाजारामध्ये कापसाची आवक झालेली आहे असे प्रशासकीय अधिकारी वर्गाने सांगितले आहे.
कापसाचा भाव 7 वरून 11 हजार 200 रुपयांवर वधारला:-
ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पाऊसामुळे कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्यामुळे उत्पादनात घट होणारच होती. चांगले दर मिळाल्याशिवाय कापूस विक्री करायची नाही असे शेतकऱ्यांनी ठरवले आहे. शेतकऱ्यांनी जी अपेक्षा केली होती ती अपेक्षा यंदाच्या वर्षी सुरुवातीलाच पूर्ण झालेली आहे. सुरुवातीच्या काळात कापसाला प्रति क्विंटल ७ हजार रुपये असा दर मिळाला आहे तर हीच मागणी अंतिम टप्प्यात पोहचली असून सध्या कापसाचा प्रति क्विंटल दर ११ हजार २०० रुपये आहे. मागील ५० वर्षात कापसाला असा कधीच दर मिळाला नाही तेवढा दर यंदा भेटलेला आहे.
काय आहे नंदुरबार जिल्ह्यातील अवस्था?
नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या वर्षी उशिरा कापूस खरेदी झाली आहे. खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे. बाजार समितीत कापूस विक्री सुरू झाली असून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळाला आहे. यंदाच्या वर्षी सुरुवातीस कापसाला ७ हजार दर मिळाला आहे तर कापसाचे शेवटच्या टप्यात दर ११ हजार रुपये वर गेला आहे. या विक्रमी दरामुळे रोज १०० वाहने कापसाची आवक बाजारात होत आहे. नानंदुरबार जिल्ह्यात यंदा ४० हजार क्विंटल कापसाची आवक झालेली आहे.
अजून एक महिना कापसाची खरेदी विक्री सुरूच राहणार आहे. वाढत्या दरामुळे शेतकरी फरदचे उत्पादन घेत आहेत. काही दिवसात कापसाचे दर वाढण्याची शक्यता आहे असे बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी वर्तविली आहे. कृषितज्ञ यांच्याकडून सांगितले जात आहे की कापसाचा दर्जा पहिल्यासारखा राहिलेला नाही. बाजारपेठेत फरदडचा कापूस येत असल्यामुळे याचा परिणाम दरावर झालेला आहे.
Share your comments